Mohite Patil
Mohite Patil 
सोलापूर

Gram Panchayat Results : अकलूजमध्ये मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का ! विजयसिंहांचे पुतणे संग्रामसिंहांचा पराभव 

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील प्रभाग तीनमधील मोहिते- पाटील विरुद्ध माने- पाटील लढतीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे पुतणे व ज्येष्ठ नेते जयसिंह ऊर्फ बाळदादा यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव झाला असून, मोहिते पाटलांना हा मोठा झटका बसला आहे. 

अकलूज ग्रामपंचायतीसाठी मोहिते - पाटील घराण्यातच दुरंगी लढत झाली आहे. 17 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये प्रतापसिंह मोहिते - पाटील विकास पॅनेलच्या उर्वशीराजे धवलसिंह मोहिते - पाटील या बिनविरोध झाल्याने 16 जागांसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते - पाटील व विजयसिंह मोहिते - पाटील विकास पॅनेलचे 16, प्रतापसिंह मोहिते - पाटील विकास पॅनलचे 16 आणि अपक्ष 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोन्ही पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची करत प्रचार केला. मोहिते - पाटील यांनी विरोधी पक्षाचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते आणि डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील यांनी अकलूजची सत्ता आमच्या ताब्यात द्या, विकास काय असतो ते दाखवून देऊ, असे आवाहन केले होते. 

माजी सरपंच संग्रामसिंह जयसिंह मोहिते - पाटील यांचा पराभव झाल्याने मोहिते - पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 14 जागी विजयसिंह मोहिते- पाटील समर्थक विजयी झाले असून, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या तीन समर्थकांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केला आहे. 

या पराभवाला फक्त आणि फक्त संग्रामसिंह यांचा जनसंपर्क चांगला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT