Alcohol sales in Solapur in lockdown 
सोलापूर

लॉकडाउनमध्ये सोलापुरात दारूविक्री 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउनच्या काळातही सोलापुरात शेळगी भागातील भीमनगर येथे एका घरात मद्य विक्री केली जात असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सर्व दुकाने बंद असून मद्यपी येथे दारू पिण्यासाठी येत असून गर्दी करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आमची नावं उघड झाली तर आम्हाला त्रास दिला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडारून सुरू आहे. सोलापुरात योग्य खबरदारीमुळे एकही रुग्ण सापडलेला नाही. लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक सेवेची सोडून सर्व दुकाने बंद आहेत. त्यात मद्यविक्रीचीही दुकाने बंद आहेत. अशा स्थितीत शेळगी भागात एक विक्रेता चोरून दारू विकत आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही ठराविक मद्यपींना हा अड्डा माहीत असल्याने दररोज तिथे दारू पिण्यासाठी गर्दी करत आहेत. मद्यप्राशन करून ते धिंगाणाही घालत असल्याचे येथील रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'ला सांगितले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन त्वरित मद्यविक्री बंद करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. 
गर्दी टाळण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळेत देखील बदल केला आहे. भाजी विक्रेत्यांच्या जागेत बदल केला असून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वजण सकारात्मक असताना चोरून दारू विकणाऱ्याचा पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT