All three were in custody, including 18 two wheeler 
सोलापूर

चोरलेल्या 18 दुचाकींसह तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : तालुक्‍यातील मरवडेतील हॉटेल महाराजाजवळ सांगली जिल्ह्यातील दोघा दुचाकी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 10 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी व त्या विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

याबाबत सविस्तर हकिगत अशी, की तालुक्‍यातील मरवडे येथील हॉटेल महाराजासमोर विनाक्रमांकाची दुचाकी विक्रीकरीता दोघे येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यांकडून मिळाली होती. पोलिसांनी 28 जानेवारी रोजी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान संभाजी हनुमंत नलवडे (वय 26, रा. संख, ता. जत, जि. सांगली) व त्याच्या मागे बसलेला प्रसन्न ऊर्फ गोट्या प्रकाश कल्ली (वय 22) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सुरवातीला थातुरमातूर उत्तरे दिली. त्यांना विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता पाच-सहा महिन्यांपूर्वी मंगळवेढ्यातील हॉटेल शिवनेरीसमोरून बनावट चावीचा वापर करून दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास केला. आरोपींनी महाराष्ट्रातील सांगली, मिरज, सोलापूर, मंगळवेढा तसेच कर्नाटकातील विजयपूर, अथनी, इरकल, चडचण येथून चोरून आणलेल्या दुचाकी तालुक्‍यातील बोराळे येथे विक्रीसाठी त्यांचे नातेवाईक कुमार तानाजी पाटील (रा. बोराळे) यांच्या ताब्यात दिल्याची कबुली दिली. त्यानंतर नऊ दुचाकींसह कुमार पाटील यास ताब्यात घेतले. इतर दुचाकी संख (जि. सांगली) येथून आरोपीच्या घरातून व शेतातून हस्तगत केल्या. यामध्ये एचएफ डिलक्‍स 11, स्कूटी दोन, होंडा शाईन एक, फॅशन प्रो एक, पल्सर एक, बुलेट एक, युनिकॉर्न एक अशा दुचाकी आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक संजय राऊत, पोलिस सुनील मोरे, अनिल दाते, अजित मिसाळ यांनी ही कारवाई केली. आरोपींनी आणखीन दोन दुचाकी व ट्रेलर चोरल्याची कबुली दिली असून या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्‍यता असल्याने त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास चालू ठेवला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT