orchestra.jpg 
सोलापूर

लाखो कलावंतांची उपासमार थांबवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या 

अण्णा काळे

करमाळा(सोलापूर) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गेली सहा महिने कामेच नसल्याने राज्यातील वेगवेगळे लाखो कलाकार मोठ्या अडचणीत आहेत. या कलाकारांना दिलासा देण्यासाठी शासनकर्त्यांनी कला व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी करमाळा येथिल द म्युझिक कलर्स ऑर्केस्ट्रा ग्रुपचे प्रमुख पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांनी केली आहे. 

श्री. अवचर यांनी सांगीतले की, कोरोनामुळे राज्यातील बॅंड, बॅंजो पथके, गायन पार्ट्या, ऑर्केस्ट्रा ग्रुप, सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते ग्रुप आदीमधील गायक, गायिका, विविध वाद्यांचे वादक, निवेदक, मंडपवाले, वाहनांचे मालक, वाहन चालक, लाईटमन, इलेक्‍ट्रिशियन, कामगार यांच्यासह इतर कलाकार मोठ्या अडचणीत आले आहेत. याशिवाय या मंडळींचा आधार असणारे बॅंड, बॅंजो मालक, ऑर्केस्ट्रा ग्रुपचे संचालक हेही आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करत आहेत. 

कोरोना काळात कलासंबंधी कार्यक्रम बंद पडल्याने रोजगार मिळेनासा झाल्याने राज्यातील अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. काहींनी मिळेल ते काम करण्याचा पर्याय निवडला पण बहुतेक कलाकारांना कामही मिळाले नाही, अशा स्थितीत उपासमारीचा सामना अनेकांना करावा लागला. त्यावेळी काही ठिकाणी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला. मदत देणारांचे आम्ही आभारी आहोत. पण आता शासनाकडून मोठी अपेक्षा असून शासनाने आमच्या कार्यक्रमांना नियम व अटींसह परवानगी दिली तर मोठा दिलासा मिळेल. कारण त्यामुळे रोजगार उपलब्ध होवून विस्कटून गेलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करता येतील, असेही ते म्हणाले. एकूणच कोरोनामुळे सर्व काही विस्कळीत झाल्याची मोठी किंमत मोजावी लागलेल्या घटकांपैकी एक असणारी कलाकार मंडळी आता कलासंबंधीचे कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत आहेत.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT