Sangola. 
सोलापूर

सांगोला-पंढरपूर सिमेंट रस्ता पूर्णत्वाकडे, मात्र मिळेना जमिनीचा मोबदला ! शेतकरी करणार "रास्ता रोको' 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला - पंढरपूर नवीन सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी, अद्याप शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही. दरम्यान, या रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित न मिळाल्यास 28 फेब्रुवारी रोजी सांगोला - पंढरपूर रस्त्यावरील संगेवाडी गावाजवळ नवीन होणाऱ्या टोल नाक्‍याजवळ शेतकरी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. 

सांगोला - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट कॉंक्रिट करण्याचे कामकाज पूर्णत्वाकडे आले आहे. या रस्त्यासाठी मांजरी हद्दीमधील नवीन होणाऱ्या टोल नाक्‍याचेही कामकाज पूर्णत्वाकडे आले आहे. परंतु अद्याप या रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांनी नवीन रस्ता सुरू करताना कामकाज बंद पाडले होते. त्या वेळी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या वेळचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा प्रश्न सोडवला जाईल व संपादित जमिनीचा मोबदलाही निश्‍चित मिळेल असे सांगून नवीन होणाऱ्या रस्त्याचे कामकाज थांबवू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी सहकार्य केले. 

परंतु, हा रस्ता पूर्णत्वाकडे आला तरीसुद्धा अद्यापही भूसंपादनाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे भूसंपादनाची रक्कम त्वरित मिळण्यासाठी या रस्त्यावरील सर्व बाधित शेतकरी एकत्र येऊन 28 फेब्रुवारी रोजी मांजरी हद्दीतील नवीन होणाऱ्या टोल नाक्‍याजवळ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. 

शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, सरकारची मात्र मिळेना 
या रस्त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, परंतु रस्त्यावरील पंढरपूर जवळील वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याचा रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाची रक्कम न देता रस्ता पूर्ण केला, परंतु वनविभागाची यासाठी परवानगी मिळाली नसल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु सरकारच्या जमिनीवर रस्ता करण्यासाठी परवानगी मिळेना, अशी अवस्था झाली आहे. 

रस्त्याच्या भूसंपादनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांनी याबाबत चर्चा केली असून या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना लवकर मिळवून देण्यासाठी मी निश्‍चितपणे प्रयत्न करीन 
- शहाजी पाटील, 
आमदार, सांगोला 

सांगोला - पंढरपूर रस्त्याच्या भूसंपादनाच्या बाबतीत लवकरात लवकर प्रश्न सोडविला जाईल. भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. 
- संदीप पाटील, 
उपविभागीय अभियंता, पुणे 

नवीन कॉंक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य केले असले तरी रस्ता पूर्ण झाला तरी अद्यापही भूसंपादनाची रक्कम आम्हाला मिळाली नाही. तरी अधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत. 
- चंद्रशेखर वाघमारे, 
शेतकरी, संगेवाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT