Ambulance off of health center in Mangalvedha taluka 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाहिकाच पडली बंद अन्‌...

गुरुदेव स्वामी

भोसे (सोलापूर) : कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. मात्र मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका दोन महिन्यापासून दुरुस्ती अभावी बंद आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील  कर्मचाऱ्यांना इतर आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असणाऱ्या रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने सदर रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी सोलापूर येथील दुरुस्ती केंद्रात दोन महिन्यापूर्वी दाखल केली. दोन महिन्याचा कालावधी होऊन देखील रुग्णवाहिका दुरुस्त होऊन भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रास न मिळाल्याने सध्या येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाड्या- वस्त्यांवर रुग्णांना भेटी देणे, आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील गावांना भेट देणे, गंभीर रुग्णांना पुढे पाठवणे आदी बाबींसाठी तसेच इतर शासकीय कामासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने व अडचणीच्या काळात इतर आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका मागितल्यास देण्यास टाळाटाळ होत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले. आरोग्य विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असताना देखील व सरकारच्या आरोग्य विभागावर लाखो रुपये खर्च करत असताना देखील आणीबाणीच्या काळात आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच बंद असल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आरोग्यसेवा नावापुरतीच
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भोसे परिसरातील गावात पुणे, मुंबई व इतर बाहेर गावावरून ग्रामस्थ येत आहेत. त्याच्या गावी जाऊन तपासणी करणे, गावोगावी केलेल्या विलगीकरण कक्षास भेट देणे गरजेचे आहे. परंतु रुग्णवाहिकाच बंद असल्याने व ग्रामीण भागातील अत्यावश्यक असणारी आरोग्यसेवा नावापुरती अत्यावश्यक राहिली आहे.
- दत्तात्रय ताटे, सरपंच, भोसे

महिन्याभरापूर्वीच रुजू झालो

महिन्याभरापूर्वी आरोग्य केंद्रात रुजू झालो आहे. अद्याप माझ्याकडे कसलाही आर्थिक व रीतसर कार्यभार कोणीच सोपवला नसल्याने व येथील कार्यालयीन कर्मचारी देखील याबाबत अधिक माहिती सांगत नसल्याने मी फक्त आरोग्य केंद्रातील रुग्ण तपासण्याचे काम करत आहे.
- आर. डी. काटे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT