Milk 
सोलापूर

वाटपाअभावी दूध उत्पादक शेतकऱ्यांची 25 कोटींची रक्कम पडून ! दुग्ध व्यवसाय विकास विभागाची उदासीनता 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : खासगी दूध संस्थांनी पुरवठा केलेल्या दूध अनुदानाची सुमारे 25 कोटींची रक्कम वाटपाअभावी पुणे येथील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडे पडून आहे. केवळ दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या उदासीनतेमुळे दूध उत्पादक शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानापासून वंचित राहिले आहेत. दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम संबंधित दूध संघांच्या खात्यावर जमा करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे यांनी दिला आहे. 

मागील वर्षी राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. याच वेळी दूध दरात घट झाली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने तीन आणि दूध संघांनी दोन रुपये असे एकूण पाच रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे धोरण जाहीर केले होते. यामध्ये राज्यभरातील बहुतांश खासगी व सहकारी दूध संघांनी सहभाग घेतला होता. 

दरम्यान, फेब्रुवारी आणि एप्रिल 2019 या दोन महिन्यांचे अनुदान थकले होते. थकीत अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी कुर्डुवाडी येथील अजिंक्‍य दूध संघाचे अध्यक्ष संतोष शेंडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या संदर्भात अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन देऊन थकीत अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने अर्थ विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार अर्थ खात्याने एप्रिल 2019 या महिन्यातील थकीत अनुदानासाठी 25 कोटी रुपये पुणे येथील दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. 

परंतु, कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांना थकीत अनुदानाची रक्कम मिळाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी थकीत रक्कम मिळावी, अशी मागणी दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडे केली आहे. परंतु, राष्ट्रीय बॅंकेत खाते नसल्याने रक्कम वर्ग करण्याचे काम थांबल्याचे दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

तांत्रिक बाबीमुळे मिळाले नाहीत पैसे 
शासनाने अनुदान वाटपासाठी 25 कोटींची रक्कम देऊनही केवळ तांत्रिक बाबीमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवाळीपूर्वी संबंधित दूध संघाच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत; अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या वेळी श्री. घुगे यांनी दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal: डिलीट डेटा, जुना मोबाईल, चॅटमध्ये कोड वर्ड आणि निकनेमचा वापर...; केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, कोर्टात काय घडलं?

India A vs Sri Lanka A : आजचा दिवस साई सुदर्शनच्या नावावर! सलग दुसऱ्या शतकाने भारत 'अ' ला दिली मजबूत पकड

भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पंतप्रधानांची मोठी कारवाई, राजकीय नेते अन् अधिकाऱ्यांसह थेट ४७ जणांच्या अटकेचे निर्देश

IND vs ENG ODI : भारताविरुद्ध इंग्लंडचा 16 सदस्यीय संघ जाहीर! नव्या चेहऱ्यांना संधी, अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण संघ

Pune Crime: सिंहगड एज्युकेशन सोसायटी अडचणीत! २७ शिक्षकांच्या ₹५.०६ कोटी वेतन अपहारप्रकरणी मारुती नवले यांच्यासह सहा जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT