Anger among farmers in Mangalwedha taluka of Solapur district 
सोलापूर

तूर पिक विम्यापासून ‘या’ तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना तुरीच्या पिक विम्यापासून तालुक्याला वगळल्याने खरीप पेरणीसाठी आशेवरील 19 हजार 473 शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे.
नदीकाठचा शेतकरी वगळता तालुक्यातील सर्व शेतकरी खरीप आणि रब्बी पिकावर गुजराण करीत आहे. अशातच गतवर्षी खरिपाच्या पीक विम्यात बाजरी, सूर्यफुलाचा विमा दिला. दोन वर्षात तुरीला हमी भाव केंद्राच्या माध्यमातून मिळालेला वाढीव दर यामुळे खरिपात तुरीचे क्षेत्र तालुक्यात वाढले. पण इतर पिकाबरोबर तुरीचा विमा देण्याची वेळ येताच ॲग्रो इन्शुरन्स कंपनीने वेगळे निकष लावत तालुक्यातील सात महसूल मंडळमधील जवळपास 19 हजार 473 शेतकरी वगळले. याबाबत विमा कंपनीचा मुंबई कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला विमा देणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. 2017 मध्ये संपूर्ण तालुका वगळला गेला तर खरीप हंगाम 2018 मध्ये देखील विमा कंपनीने तुर पिकाला चुकीचे निकष लावत शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार प्रताप केला. गतवर्षी देखील 4012 शेतकऱ्यावर विमा कंपनीने अन्याय केला. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून ही रक्कम पदरात पाडून घेतली. तर मृग बहार 2019 मध्ये डाळिंब पिकाची भरपाई देताना विमा कंपनीने प्रत्येक महसूल मंडलाला वेगवेगळी भरपाई दिली. तीन मंडलातील शेतकरी वगळले. ते ही अजून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागे असलेले साडेसातीचे शक्लकाष्ठ संपता संपेना. दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी सर्वाच पिके वाया गेली असताना कंपनीने फक्त बाजरीचे 19439, मका 1368, सूर्यफूल 9093 भरपाई दिली. त्यावर शेतकऱ्यानी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे करून घेतली आता पेरणीसाठी तुर पिक विम्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर मात्र पेरणीसाठी कर्ज काढण्यासाठी बॅक शोधण्याची वेळ आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT