Deshmukh 
सोलापूर

गणपतराव देशमुखांचा वारसदार अनिकेत देशमुख एमएस ऑर्थो पास ! मात्र राजकारणात सक्रिय होण्याबाबत प्रश्‍नचिन्हच

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : येथील विधानसभा निवडणुकीतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख हे एम. एस. ऑर्थो ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षणांनतर ते राजकारणात सक्रिय सहभागी होणार का, याकडे सांगोलावासीयांचे लक्ष लागले आहे. 

डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अल्पशा मताने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अनिकेत देशमुख यांनी आपल्या शिक्षणासाठी तालुक्‍याच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती. नुकतेच ते एम. एस. ऑर्थोची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

डॉ. अनिकेत यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यालय, बारावीपर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले. एम. बी. बी. एस. चे शिक्षण राजर्षी शाहू महाराज शासकीय मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथे तर एम. एस. ऑर्थोचे शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले आहे. एम. एस. ऑर्थो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे सांगोला शहर व तालुक्‍यातून अनिकेत देशमुख यांचे अभिनंदन केले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या जागी शेवटच्या क्षणी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शेकापतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला असला तरी त्या निवडणुकीत त्यांचा मोठा प्रभाव दिसून आला होता. परंतु निवडणुकीनंतर शिक्षणासाठी ते बाहेर गेल्याने शेतकरी कामगार पक्षाचे निवडणुकीतील उमेदवारच जनतेच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यावर मोठी टीकाटिप्पणी झाली होती. आपले शिक्षण झाल्यानंतर आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय सहभाग घेतात का, याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT