The animal has been diagnosed with Lumpy Skin Diarrhea in Tisangi Sonke area.jpg 
सोलापूर

तिसंगी-सोनके परिसरात जनावरास लुम्पी स्कीन डायसेस आजाराची लागण

संजय हेगडे

तिसंगी (ता.पंढरपूर) : तिसंगी-सोनके परिसरात लुम्पी स्किन डाययसेस आजार वाढत चालल्याने शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत आले आहे. लुम्पी स्किन हा आजार शेतकऱ्यांचे दुधाळ प्राण्यावर अट्याक करत आहे. कोरोणाच्या काळात शेतकरी अडचणीत असताना, पावसाने सर्व पीके वाहून गेली. त्यात या लुम्पी स्किन आजाराने अट्याक केल्याने शेतकरी पशुधन वाचण्यासाठी धडपड करीत आहे. 

गेली सहा-सात महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची नाडी बंद झाली होती. हाता तोंडाला आलेली पीके दराअभावी शेतात सडून गेली होती. कोरोनातून कराबसा शेतकरी सावरत असताना पावसाने पिके वाहून गेली. त्यात पुन्हा तिसरे संकट शेतकऱ्यांसमोर आले. लुम्पी स्किन डायसेस आजाराने शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत आले आहे.

लुम्पी स्किन हा आजार नवीन असल्याने शेतकऱ्यांमध्ये या अजाराविषयी जागृकता नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. आजार झाल्यावर गाईच्या शरिरावर मोठ-मोठ्या फोडी येवून फुटतात यातून रक्त श्राव होवू लागते. या गाईस खर्च करणेपण परवडत नाही. शासकीय यंत्रनेने, पशु वैद्यकीय विभागाने शेतकऱ्यांस मदत करावी, अशी मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

कोरोनाकाळात दुधाला दर नव्हता. आज दुधास दर मिळतोय, पण लुम्पी स्किन आजाराने पुन्हा अडचणीत आणले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी.
- औदूबर खांडेकर, युवा दुध उत्पातक शेतकरी, सोनके

तिसंगी परिसरात जवळ पास सहा ते सात हजार लिटर दुध उत्पादन होत आहे. पण लुम्पी स्किन आजाराने एक हजार लिटर दूध कमी झाले आहे. शेतकऱ्यांनाचे पशुधन अडचणीत आहे.
- मल्हारी हेगडे, अध्यक्ष- प्रभात डेअरी तिसंगी, ता. पंढरपूर

लुम्पी स्किन डायसेस हा नवीन आजार असल्याने शेतकऱ्यांनी या आजाराची लक्षणे दिसल्यास वेळेत उपचार करून घ्यावेत.
- डॉ औंदुबर व्यवहारे, साह्यक पशु वैद्यकीय अधिकारी, तिसंगी

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT