Striped_Hyena_5.jpg 
सोलापूर

कारंबा परिसरातील तो प्राणी बिबट्या नव्हे तरसच : वन खात्याचा दावा 

अरविंद मोटे

सोलापूर : कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे बुधवारी बिबट्यासदृश्‍य प्राणी आढळल्याची अफवा उठली होती. वनखात्याने तो बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट केले. 

26 जानेवारी रोजी वाळूज (ता. मोहोळ) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका मुलाचा बळी गेला होता. तेव्हापासून या परिसरातील ढोराळे (ता. बाशी), नरखेड (ता. मोहोळ), साखरेवाडी (ता. उ. सोलापूर) या ठिकाणी बिबट्यासदृश्‍य प्राणी पाहिल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले होते. बुधवारी (ता. 10) कारंबा, खेड, नान्नज, गुळवंची परिसरात बिबट्यासदृश्‍य प्राणी आढळल्याची अफवा उठली. यासंदर्भात महादेव चाकोते यांनी वनखात्याला कळवले होते. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे जाऊन बिबट्यासदृश्‍य प्राणी पाहिला असे सांगणारे बडेभाई शेख यांना अनेक प्राण्याचे छायाचित्रे दाखवली असता त्यांनी तरसच्या चित्रावर बोट ठेवत असा प्राणी असल्याचे सांगितले. 

कारंबा (ता. उ. सोलापूर) येथील तरस आढळलेले हे ठिकाण नान्नज माळढोक अभयारण्याला लागून आहे. या ठिकाणी नुकतीच आग लागून आठ ते दहा हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे अभयारण्यातील काही प्राणी घाबरून बाहेर गेले असण्याची शक्‍यता वन्यजीवप्रेमीकडून व्यक्त होत आहे. 

तरस हा शक्‍यतो मृत प्राण्यांच्या मासांचे भक्षण करतो. प्रसंगी शिकार करत असला तरी मनुष्य प्राण्यांवर सहसा हल्ला करत नाही. त्यामुळे या लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 
-इरशाद शेख, 
विभागीय वनाधिकारी, वन्यजीव 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT