Animal market in Karthiki Wari of Pandharpur canceled 
सोलापूर

पंढरपूरच्या कार्तिकी वारीतील जनावरांचा बाजार रद्द; लंम्पी आजारामुळे निर्णय 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेची अनिश्‍चितता असताना या यात्रेत भरवला जाणारा जनावरांचा बाजार सोलापूर जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीज या विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने रद्द करण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने घेतला आहे. 

दरवर्षी कार्तिकी यात्रेच्या काळात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या आवारात जनावरांचा बाजार भरवला जात असतो. गेल्या काही वर्षांपासून हा बाजार वाखरी येथील तळावर भरवला जातो. पंढरपूर येथील जनावरांच्या या बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असते. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन यंदाचा हा बाजार रद्द करण्यात आला आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीज या विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे या रोगाचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाव्दारे, बाह्य किटकाव्दारे, लाळ आणि स्त्राव आदी माध्यमातून होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सद्यस्थितीत आवश्‍यक आहे. सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित केलेला असून प्राण्यांचे बाजार, जत्रा भरवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउनची बंधने लागू केलेली आहेत. त्यामुळे 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर अखेर कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT