Another corona positive in Barshi town in Solapur district 
सोलापूर

बार्शी शहरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचे अहवाल प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्यात मंगळवारी (ता. १६) आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून एक जणाचा अहवाल प्राप्त झाला असून वायकुळे प्लॉट येथील एक जण पूणे येथे उपचार घेत असताना त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा भाग प्रशासनाने त्वरीत प्रतिबंधित केला आहे. 
बार्शी शहर तीन व ममदापूर दोन असे पाच रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. मंगळवारी रात्री बार्शी शहरातील वायकुळे प्लॉट, उपळाई रोड येथील रुग्ण पूणे येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तालुक्यात एकूण 21 जण पॉझिटिव्ह आढळले असून उक्कडगाव येथील एक व वाणी प्लॉट येथील एक जण बरे होऊन गेले आहेत.
बार्शी शहर तीन, ममदापूर दोन असे पाच रिपोर्ट प्रलंबित आहेत. पाच कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून 13 जण बरे होऊन गेले आहेत, अशी माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली.
बार्शी शहरात तिसरा कोरोना रुग्ण आढळताच शहरात सोशल मिडियावर बातमी व्हायरल झाली अन् नागरिकांसह प्रशासनाचे धाबे दणाणले. हा भाग प्रशासनाने ताब्यात घेऊन तेथील संपर्कातील नागरिकांची तपासणी सूरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अवैध फेरीवाल्यांना आता रेल्वेच्या परिसरात प्रवेश नाही! रेल्वेचे नवीन नियम; नवीन डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली काय आहे? वाचा...

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Zomato Hikes: Zomato चा धक्का! प्लॅटफॉर्म फी पुन्हा वाढली, जेवण ऑर्डर करणं महाग; आता एका ऑर्डरला लागतील एवढे पैसे

अमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंत का? दिसायला अभिनेत्रीपेक्षाही सुंदर, भाचीही इतकी गोड की पाहतच राहाल

SCROLL FOR NEXT