Siddhi Residency 
सोलापूर

कोरोना : सोलापुरातील "या' अपार्टमेंटच्या रहिवाशांनी केला "लॉकडाऊन'!

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कालच लॉकडाऊन केला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाशी सामना हा इतरांच्या संपर्कात न येता व घराबाहेर न पडता करता येत असल्याने भवानी पेठ येथील सिद्धी अपार्टमेंट या पाच मजली इमारतीतील फ्लॅटधारकांनी अपार्टमेंटच "लॉकडाऊन' करून बाहेरील व्यक्तींपासून स्वत:चे विलगीकरण केले आहे.

31 मार्चपर्यंत राहणार लॉकडाऊन
सिद्धी अपार्टमेंटमध्ये 20 फ्लॅट असून, लहान-थोर असे 110 रहिवासी आहेत. या अपार्टमेंटमध्ये व्यावसायिक, डॉक्‍टर व प्राध्यापक राहतात. डॉक्‍टर व प्राध्यापक फ्लॅटधारकांना मार्गदर्शन करीत आहेत. कोरोनाचा वाढता विस्तार रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे महत्त्वाचे आहे, हे जाणून रविवारच्या जनता कर्फ्यूच्या दिवशी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बैठक घेऊन अपार्टमेंटच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू केली आहे. याची अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत व परिस्थितीनुसार सुरू राहणार आहे, अशी माहिती येथील रहिवासी विकास जैन यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

अपार्टमेंटमधील लॉकडाऊनचे नियम

  • अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बाहेर जायचं नाही व बाहेरचे कोणी अपार्टमेंटमध्ये यायचे नाही.
  • काहीतरी महत्त्वाचे कारण असेल तर वॉचमनकडे तशी नोंद करून बाहेर पडावे.
  • अपार्टमेंटमधील रहिवासी बाहेरून येताना गेटवरील सॅनिटरायझरने हात धुणार व अपार्टमेंटमधील नळावर हात-पाय, तोंड साबणाने स्वच्छ धुवूनच अपार्टमेंटमध्ये जाणार.
  • प्रत्येक वेळी गेटला हात लावल्यानंतर लगेच सॅनिटरायझरने गेट स्वच्छ करण्याच्या सूचना वॉचमनला देण्यात आल्या आहेत.
  • दूधवाले, कामवाली मावशी, रिक्षा व हेल्पर यांना अपार्टमेंटमध्ये येण्यास बंदी.
  • कामवाली मावशी व हेल्परना बंदीच्या कालावधीचा पगार देणार.
  • कामवाली मावशी व हेल्पर नसल्याने घरातील कामात पुरुष मंडळी मदत करणार.
  • वॉचमनचा त्याच्या घरातून येणारा डबाही बंद; फ्लॅटधारक त्याच्या जेवणाची व्यवस्था करणार.
  • पाच मजल्यांची व लिफ्टची स्वच्छता ज्या-त्या मजल्यावरील फ्लॅटधारक दर दोन तासांनी करणार.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या संपर्कात न येणे हा एकमेव उपाय आहे. प्रत्येकाच्या आरोग्याचा व जिवाचा प्रश्‍न आहे. दूधवाला, इतर बाहेरच्या व्यक्ती आत येऊ नयेत व अपार्टमेंटमधील व्यक्ती महत्त्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडू नयेत यासाठी आम्ही अपार्टमेंट लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरूही केली आहे.
- ओमप्रकाश करवा,
अध्यक्ष, सिद्धी अपार्टमेंट

कोरोना विषाणूचा संसर्ग एकाला झाला तर लगेच तो इतरांवरही संक्रमित होतो. त्यामुळे विनाकारण इतर नागरिकही संकटात येतात. सध्याची स्टेज देशासाठी व राज्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणाच्याही संपर्कात न येता रहिवाशांचे विलगीकरण करून कोरोनाची साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अपार्टमेंट लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. शिवशंकर खोबरे,
रहिवासी, सिद्धी अपार्टमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT