Ganaraya 
सोलापूर

गणेशोत्सव साजरा करा वैयक्तिक पातळीवर; कोणी केले आवाहन? वाचा सविस्तर

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा न करता वैयक्तिक पातळीवर साजरा करावा आणि संसर्ग टाळावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी केले आहे. 

नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पोलिस पाटील, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासमवेत मोहरम व गणेशोत्सव अशी शांतता कमिटीची बैठक झाली. प्रास्ताविक सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी केले. पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी सांगितले की, संपूर्ण जगात कोरोना संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये लाकडाउन कमी केल्यापासून संसर्गाचा वेग वाढत आहे. तो सध्या कमी करण्यासाठी शासनाचे व प्रशासनाचे आदेश प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. 21 तारखेला मोहरम आहे, 22 तारखेला गणेशोत्सव सुरू होत आहे. सर्व जनतेने लॉकडाउनच्या काळात चांगले सहकार्य केले आहे. भविष्यातही करणे गरजेचे आहे. मूर्ती आणताना सार्वजनिकरीत्या जाऊ नये. रस्त्यावर, चौकात व सार्वजनिक ठिकाणी यंदा गणेश मूर्ती स्थापन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मंदिर आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आरती करावी. पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी गर्दी करू नये. गणेश विसर्जन घरातच करावे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. मिरवणुकांना व वाद्ये, डॉल्बी यांनाही बंदी आहे. 

बैठकीस अकलूज बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, मार्केट कमिटीचे संचालक बाहुबली चंकेश्वरा, ग्रामपंचायत सदस्य इम्रान बागवान, रणवीर देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते अक्षय भांड, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. के. साळवे, विशाल साळवे, सामाजिक कार्यकर्ते लतीफ नदाफ, शहीद मुलानी, महंमद काझी, अविनाश दोशी आदी उपस्थित होते. 

या वेळी नातेपुते पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व पोलिस पाटलांना कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या हस्ते पमाणपत्र देण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT