सोलापूर

सोलापूरातून इतर राज्यात जाण्यासाठी 12846 जणांचे अर्ज 

प्रमोद बोडके


सोलापूर : लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या तमिळनाडूतील मजुरांना गावी पाठविण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची  माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थलांतरीत मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनकडून नियोजन करण्यात येत आहे. याबाबत श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूरातून इतर राज्यात जाण्यासाठी 12846 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये निवारा शिबीरातील 3290 स्थलांतरीत मजूरांचा समावेश आहे. सोलापूरातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 5528 अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

इतर जिल्ह्यातून सोलापूरात येण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या 107 जणांना ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या 157 अर्जांना ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे अर्ज पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT