nete 
सोलापूर

मंगळवेढ्यातील 14 उमेदवारांचे अर्ज अपात्र ! हरकतींसाठी जोडलेले दाखले नेमके कुणाचे? 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल 14 उमेदवारांचे अर्ज विविध हरकती घेता अपात्र करण्यात आले. परंतु, हरकतींसाठी जोडलेले दाखले नेमके कुणाच्या सहीचे, असा प्रश्न अपात्र झालेल्या उमेदवारांना पडला आहे. 

याबाबत सविस्तर हकीकत अशी, की तालुक्‍यामध्ये 23 ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये भोसे ग्रामपंचायतीसाठी 5 प्रभागातून 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या उमेदवारांकडे शौचालय आहे, तशी नोंद ग्रामपंचायतीकडे आहे. तरीही छाननीच्या वेळी पाच प्रभागातील प्रभाग एकमध्ये 3, प्रभाग दोनमध्ये 4, प्रभाग तीनमध्ये 1, प्रभाग चारमध्ये 4 आणि प्रभाग पाचमधील 6 इतक्‍या उमेदवारांच्या अर्जांना हरकत घेण्यात आली. त्यामुळे आखाड्यात 43 अर्ज शिल्लक राहिले. 

हरकतीमधील काही उमेदवारांकडे घेरडी (ता. सांगोला) येथे शौचालय आहे, परंतु भोसे येथे शौचालय नाही व काही उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी स्वरूपाचे काम केल्याचे पुरावे म्हणून ग्रामसेवकांचे दाखले जोडण्यात आले. परंतु सदर दाखल्याबाबत या ग्रामपंचायतीकडे दोन ग्रामसेवकांनी कामकाज केले असून, संबंधित ग्रामसेवकांनी दाखल्याबाबत हात वर केल्यामुळे हरकतीसाठी घेतलेले दाखले नेमके कुणाच्या सहीचे, हा प्रश्न अपात्र उमेदवारांना छाननीदरम्यान पडला. 

दरम्यान, याबाबत हरकतीसाठीचे ग्रामसेवकासोबत झालेले फोन रॅकार्ड व व्हॉट्‌सऍपवर टाकलेले मेसेजचे पुरावे तहसीलदारांना दाखवण्यात आले. परंतु हरकत घेण्याची वेळ निघून गेल्याने अखेर ते 14 उमेदवार अपात्र झाले. 

ग्रामपंचायतीच्या "8 अ' ला शौचालयाची नोंद आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी केली नाही, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असताना विरोधकांनी ग्रामसेवकांच्या बनावट सहीचे दाखले जोडून उमेदवाराला अपात्र करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयात दाद मागू. 
- कर्मवीर आवताडे, भोसे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

SCROLL FOR NEXT