सोलापूर

"पीएच.डी.धारक शिक्षकांची  रिक्त पदांवर नियुक्ती करा' 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः राज्यातील शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या वर्ग-एक, वर्ग-दोन, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या पदांवर सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनातील कार्यरत असणाऱ्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.)धारक शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अनिल सर्जे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. 


राज्यात सुमारे 100च्या पुढे शिक्षक पीएच.डी.धारक आहेत. शालेय शिक्षण विभागातील विविध पदांवर पदोन्नती व भरती करताना या शिक्षकांचा कधीही विचार केला नाही. ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आपली नोकरी सांभाळून शैक्षणिक गुणवत्ता वाढवली आहे, संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे, अशा शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून विविध पदांवर बढती दिल्यास शालेय शिक्षण विभागाची निश्‍चितच प्रगती होणार आहे. ही बाब भारतातील सर्व राज्यांसाठी आदर्श ठेवणार आहे. देशात राज्यातील शालेय शिक्षण विभाग सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी हे शिक्षक निश्‍चितच आपले योगदान देतील याची खात्री आहे. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अनिल सर्जे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT