Canva
सोलापूर

उपळाई आरोग्य केंद्रात त्रुटी! तपासणीसाठी आयएएस आव्हाळेंची नेमणूक

"अधिकाऱ्यांच्या गावा'तील आरोग्य केंद्रात त्रुटी! तपासणीसाठी आयएएस आव्हाळेंची नेमणूक

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेल्या आठवड्यात उपळाई बुद्रूक येथील आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली होती.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी गेल्या आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचा (Primary Health Center) कारभार कोरोना (Covid-19) या महामारीच्या काळात कसा चालतो, हे पाहण्यासाठी उपळाई बुद्रूक (ता. माढा) (Uplai Budruk, Taluka Madha, Dist. Solapur) येथील आरोग्य केंद्रास संध्याकाळच्या वेळी अचानक भेट दिली होती. या वेळी आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत काही त्रुटी आढळून आल्याने या आरोग्य केंद्राच्या तपासणीसाठी त्यांनी चौकशी समिती नेमली असून, त्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांची नेमणूक केली आहे.

अधिकाऱ्यांचे गाव म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेल्या उपळाई या गावातील आरोग्य केंद्रात सर्व काही आलबेल असल्याचे वाटत होते, पण या केंद्राच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी संध्याकाळच्या वेळी अचानक उपळाई आरोग्य केंद्रास भेट दिल्याने सर्वांची धांदल उडाली होती. आरोग्य केंद्राचे दप्तर तपासणी तसेच इमारतीच्या खोल्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली. तसेच आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत नागरिकांनीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर नाराजी दाखवत, समस्या मांडल्या होत्या. त्यांच्या या भेटीप्रसंगी काही त्रुटी आढळून आल्याने व अधिकाऱ्यांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तातडीने उपळाई बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या तपासणीसाठी चौकशी समिती नेमली आहे.

चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी (आयएएस) मनीषा आव्हाळे यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेल्या उपळाई या गावातील आरोग्य केंद्राच्या तपासणीसाठी चौकशी समिती नेमल्याने, तपासणी कशी होतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT