नवनिर्मित नातेपुते नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी कैलास केंद्रे ! Canva
सोलापूर

नवनिर्मित नातेपुते नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी कैलास केंद्रे !

नवनिर्मित नातेपुते नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी कैलास केंद्रे !

सुनील राऊत

नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर 3 ऑगस्ट रोजी नगरपंचायतीमध्ये करण्यात आले असून, कैलास केंद्रे या नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी ठरले आहेत.

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते (Natepute) ग्रामपंचायतीचे रूपांतर 3 ऑगस्ट रोजी नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांच्याकडून नवनिर्मित नातेपुते नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे (Kailas Kendre) यांची नियुक्ती झाली असून, ते या नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी ठरले आहेत. माढा नगरपंचायतीत केंद्रे यांनी अडीच वर्षे काम पाहिल्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन निर्माण झालेल्या नवनिर्मित नगरपंचायतीच्या प्रश्नांचा त्यांना असलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग नातेपुतेकरांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कैलास केंद्रे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे असून 2015 च्या बॅचचे मुख्याधिकारी आहेत. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरवात 21 डिसेंबर 2016 पासून माढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून केली. 25 जुलै 2019 पासून ते सांगोला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारा, सतत नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारा अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

माढा नगरपंचायतीत त्यांनी अडीच वर्षे काम पाहिल्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन निर्माण झालेल्या नवनिर्मित नगरपंचायतीच्या प्रश्नांचा त्यांना असलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग नातेपुतेकरांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगरपंचायत कायद्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कार्यालयीन कामकाजाची घडी बसवणे, शहराचा विकास आराखडा तयार करणे, शहराची स्वच्छता, पाणीपुरवठा, घरकुल योजना व इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे याकडे विशेष लक्ष असेल, असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले.

केंद्रे यांनी आज पदाची सूत्रे हाती घेतली असून या वेळी माजी सरपंच भानुदास राऊत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पवीण काळे, महेश सोरटे, शहराध्यक्ष देविदास चांगण, अमोल पाडसे, विनायक उराडे, संजय उराडे, बादल सोरटे, सचीन भोजणे, ज्ञानेश्वर उराडे, धनंजय रासनकर, फंटा टेंबरे, पै. देविदास काळे, गणेश कुचेकर, महादेव बरडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT