Shaikh Brothers sakal
सोलापूर

Motivation News : दगडी माळावर पाण्यासारखा घाम गाळून केलेली तपस्या आली फळाला

अरणच्या शेख बंधूंनी माळरानावर फुलवले नंदनवन!

सकाळ वृत्तसेवा

मोडनिंब - इतरांच्या शेतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या अरण (ता. माढा) येथील शेख बंधूंनी जिद्दीच्या जोरावर माळरानावर नंदनवन फुलविले आहे. जिद्दीला कष्टाची जोड देत, दगडी माळावर पाण्यासारखा घाम गाळून केलेली तपस्या आता फळाला आली आहे.

कर्मयोगी सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्री बाबासाहेब शेख यांचे कुटुंब बाग छाटणी, कलम भरणे आदी रोजंदारीची कामे करून उदरनिर्वाह चालवायचे. शेती बक्कळ बारा एकर; पण सगळीच पडीक माळरान. परंतु त्यांची मुलं हाताखाली आली आणि त्यांनी कर्तबगारी दाखवायला सुरू केली.

सलाम आणि गुलाम या भावंडांनी जुन्या विहिरीचा गाळ काढला, खोली थोडी वाढविली. उपजीविकेचे साधन म्हणून आंब्याची रोपवाटिका सुरू केली आणि यशाचा काळ सुरू झाला. आलेल्या उत्पन्नातूनच माळरानावर बोअर पाडले. यामुळे पाण्याची शाश्वत हमी निर्माण झाली.

दोन-तीन वर्षातच माळरानाचं रूपडं बदलत गेलं. अपार मेहनत घेत या भावंडांनी दोन एकर केशर आंबा, दोन एकर लिंबू, दोन एकर संत्री, एक एकर चिंच व एक एकर पेरू या फळपिकांची लागवड केली. कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही त्यांनी या फळबागा जपल्या. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांना यावर्षी यश आलं.

फळपिके व केशर आंब्याच्या रोपवाटिकेतून जवळपास पंधरा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न त्यांनी घेतलं. काही वर्षांपूर्वी रोजंदारीवर काम करणाऱ्या या शेख भावंडांनी माळारानावर फुलविलेले नंदनवन प्रेरणादायी ठरत आहे.

अनेक रानमेव्याच्या झाडांना लगडली फळे

या शेख बंधूंनी शेताला कुंपण म्हणून खजुराची लागवड केली. जवळपास दोनशे खजुरांच्या झाडांना यावर्षी फळं येऊ लागली आहेत. पुढील वर्षीपासून खजुराचेही अतिरिक्त उत्पन्न यांना मिळणार आहे. यासोबतच सफरचंद, काजू, जांभूळ यासह अनेक रानमेव्यांच्या झाडांना फळे लगडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT