सोलापूर : खासगी बसमुळे बसतोय भुर्दंड sakal
सोलापूर

सोलापूर बसस्थानक परिसरात खासगी वाहनचालकांची मनमानी

एसटी कर्मचाऱ्यांच्या लांबलेल्या संपामुळे नागरिक, व्यावसायिक हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (state trasnport carporation) कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटलेला नाही. खासगी प्रवासी(private travels) वाहनांना शासनाने प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. तसेच बसस्थानक परिसरात प्रवासी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा गैरफायदा अनेक खासगी वाहनचालक घेतात. याचा फटका बसस्थानक परिसरात राहणारे नागरिक व्यावसायिकांना बसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकापासून दोनशे मीटर लांब किंवा शहराबाहेर खासगी वाहनांना थांबा देण्यात आला आहे. तसेच खासगी वाहने, काळी-पिवळी, टॅक्‍स, ट्रॅव्हल्स गाड्या बसस्थानकापासून दूर ठेवण्याबाबत सूचना केल्या जात असल्या तरी पंचवीस मीटर अंतरातच बस स्थानकाजवळ दोन्ही बाजुला खासगी वाहने उभी केली जातात. गाड्या भरेपर्यंत येथे दररोज धुमाकूळ घातला जात आहे.

याबाबत स्थानिक व्यावसायिक नागरिकांनी वाहनचालकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही ऐकून घेण्यास तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नेहमीच वाहनधानक, नागरीकांची वर्दळ असते. दररोज शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्याचबरोबर एखादी रुग्णवाहिका देखील आली तर या ठिकाणी या गर्दीमुळे रुग्णवाहिका जाण्यासाठी देखील रस्ता मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. अनेक खासगी गाड्या वीना नंबर प्लेट प्रवासी वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे. याकडे ना आरटीओ ना पोलिस प्रशासनाचे लक्ष नसल्याचा प्रत्यय येत आहे. या वाहनधारकांना लक्ष घालून या वाहनधारकांना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. सध्या संपामुळे बस स्थानकात बसगाड्या काही प्रमाणात येत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालकांची चांदी होत आहे. तर प्रवाशी मात्र आर्थिक कोंडीत सापडले अाहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT