Archana Patil 
सोलापूर

राज्यमंत्री भरणेंनी धरावा धनगर समाजाच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह ! डॉ. अर्चना पाटील यांची मागणी

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे धनगर समाजाला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सातारा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी केली आहे. 

डॉ. पाटील म्हणाल्या, की राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पंढरपूर विधानसभेची जबाबदारी आहे. या मतदार संघामध्ये धनगर - ओबीसी समाजाची ताकद मोठी आहे. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे. अशी या अगोदरच धनगर समाजाच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येक वेळी त्याच त्याच लोकांना आलटून पालटून उमेदवारी दिली जाते, त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांकडून मात्र धनगर समाजाला कायम दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यामुळे धनगर समाजातील तरुण आता विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला तिकीट मिळावे यासाठी आग्रही आहेत. जर तिकीट नाही दिले तर प्रस्थापितांविरोधात बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. 

प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाला गृहीत धरले जाते. फक्त मतांपुरता वापर केला जातो. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे, असेही या वेळी डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला या निवडणुकीमध्ये गृहीत धरू नका. महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाला भरीव निधी न दिल्यामुळे समाजामध्ये पक्षाविषयी नाराजी आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या योजनांबद्दल सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्‍यक होते; पण तसे होताना दिसत नाही, असेही या वेळी डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT