arrival of mango in pandharpur rush to shop on the occasion of akshaya tritiya Sakal
सोलापूर

Akshaya Tritiya 2024 : फळांच्या राजाची पंढरीत आवक; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीस गर्दी

साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेचा सण यंदा शुक्रवारी (ता. १०) साजरा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेचा सण यंदा शुक्रवारी (ता. १०) साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ८) सुमारे चारशे ते साडेचारशे क्रेट केशर आंब्याची आवक झाली आहे. या सणासाठी आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे फळांचा राजा आंबा बाजारामध्ये भाव खात असल्याचे चित्र दिसून आले.

अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्याचा प्रघात असल्याने हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी आमरस पुरीचा बेत केला जातो. यंदा शुक्रवारी अक्षय तृतीया आहे. या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आज सुमारे चारशे ते साडे चारशे क्रेट केशर आंब्याची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावामध्ये किरकोळ विक्रेत्यांनी आंबा चढाओढीने खरेदी केला.

लिलावामध्ये प्रतवारीनुसार केशर आंब्याचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलो होते. केशर आंब्याबरोबरच कर्नाटक व तेलंगण राज्यातील तोतापुरी, बदाम, मल्लिका, लालबाग, कर्नाटकी हापूस आंब्याची देखील काही प्रमाणात आवक झाली होती. किरकोळ विक्रेत्यांनी लिलावामध्ये खरेदी केलेला आंबा येथील नवी पेठ भाजीबाजारामध्ये विक्री केला जात आहे.

नवीपेठ बाजारामध्ये केशर आंबा १५० ते २०० रुपये, लालबाग १०० ते १५० रुपये, बदाम ८० ते १०० रुपये, मल्लिका १२० ते १५० रुपये, कर्नाटक हापूस १२० ते १५० रुपये तर तोतापुरी ६० ते ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केला जात होता. अक्षय तृतीयेसाठी आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे आज बाजारामध्ये फळांचा राजा आंबा भाव खात असल्याचे चित्र दिसून आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा मुहूर्त

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीयेला आखिती असे देखील म्हणतात. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. गुढीपाडवा, बलिप्रतिपदा (पाडवा), दसरा आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त आहेत. अक्षय तृतीयेचे औचित्य साधून नागरिक सोने-चांदी, वाहने, घर, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आदींची खरेदी करतात. या दिवशी अनेक शुभ कार्यांचा प्रारंभ केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT