unnamed (4).jpg 
सोलापूर

पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स पुरस्कार

तात्या लांडगे

सोलापूर : गडचिरोलीहून सोलापुरात पोलिस आयुक्‍तपदी विराजमान झालेले पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा यंदाचा अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स अवार्ड जाहीर झाला आहे.


प्रशासकीय आणि पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स अवार्ड दिला जातो. यंदा सोलापूरचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, आर. विमला (इंडियन ऍडमिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस), गुरुप्रसाद (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) आणि शरद उघडे (मुंबई म्युन्सिपल सर्व्हिस) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 जुलै 2019 रोजी अंकुश शिंदे यांनी आयुक्‍तपदाचा पदभार घेतला. त्यांनी प्रारंभीच्या काळात पूर्व भागातील अवैध ताडी विक्री व्यवसाय, हातभट्टी व्रिकी व तयार करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई केली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियोजनबध्द कामकाज पाहिले. दरम्यान, चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप टाकली. तर अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांना तथा त्यात भागिदारी असलेल्यांना थेट घरचा रस्ताही दाखविला. दुसरीकडे गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या नगरसेवकांवरही कारवाई केली.

खासगी सावकारकी अन्‌ मटका व्यवसायावर मोठी कारवाई
सर्वसामान्यांशी निगडीत अवैध खासगी व्यवसाय आणि मटका बुकीच्या व्यवसायावर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी मोठी कारवाई केली. त्यासाठी त्यांनी आयुक्‍तालयात तक्रार कक्ष स्थापन केला. त्याच्या माध्यमातून तक्रारदारांच्या तक्रारीतील तथ्य पडताळून अनेकांवर कारवाईही केली. आंदोलन असो की मोर्चे, यावेळी त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन ते आंदोलन, मोर्चा शांततेत होण्यासाठी यशस्वी प्रयत्नही केला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स अवार्ड जाहीर केला. शिंदे यांनी अन्य अधिकाऱ्यांप्रमाणे धडक कारवाई न करता तक्रारदारांना विश्‍वासात घेऊन संशयितांना समज देऊन कायदेशीर कारवाई केली. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतूकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT