Chandrabhaga Yatra Bus Stand esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : पंढरीत 11 हेक्टर जागेवर 34 फलाटांचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक; तब्बल 'इतक्या' कोटींची इमारत

पंढरपूर येथे एस.टी. महामंडळाचे नवीन अद्ययावत बसस्थानक असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नव्याने बांधलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा यात्रा बसस्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी बस सोडण्यात येणार आहेत.

सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे एस.टी. महामंडळाच्या (ST corporation) जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटाचे चंद्रभागा यात्रा बसस्थानक (Chandrabhaga Yatra Bus Stand) व त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील, असे यात्री निवास बांधण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी आज (ता. १७) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.

पंढरपूर येथे एस.टी. महामंडळाचे नवीन अद्ययावत बसस्थानक असणार आहे. दररोज शेकडो बसगाड्या पंढरपूर येथून राज्यभरात ये-जा करतात. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीसारख्या मोठ्या यात्रांसाठी सध्याचे बसस्थानक अपुरे पडत होते. त्यामुळे महामंडळाकडून आपल्या स्वत:च्या ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटांचे भव्य ‘चंद्रभागा यात्रा बसस्थानक’ निर्माण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना निवासाची अल्पदरात सोय व्हावी, त्यांना बसमधून सहजपणे प्रवास करता यावा म्हणून बस स्थानकासोबतच त्याठिकाणी यात्रीनिवास देखील बांधण्यात आले आहे. या यात्री निवासात एकावेळी एक हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एस.टी.चे कर्मचारी व यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून, त्यासाठी ३३ कोटींचा खर्च झाला आहे.

एसटी महामंडळाच्या ५०० कर्मचाऱ्यांची सोय

नव्याने बांधलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा यात्रा बसस्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी बस सोडण्यात येणार आहेत. येथे महामंडळाच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच सुमारे एक हजार यात्रेकरू देखील याठिकाणी राहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT