Ashadhi Ekadashi Pandharpur  esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : 'टोकन दर्शन'नंतर आता फक्त दोन तासात मिळणार विठुरायाचं पदस्पर्श दर्शन; मुख्यमंत्र्यांकडून आराखड्याची घोषणा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे आता केवळ दोन तासांमध्ये पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.

भारत नागणे

सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ दोन तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे.

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे आता केवळ दोन तासांमध्ये पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने टोकन दर्शन (Tirupati Balaji) व्यवस्थेला मान्यता दिली आहे.

गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकन व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज 103 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली.

सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ दोन तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी आज 'सकाळ'शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Pune Health: पुण्यात खळबळ! खेड-शिवापूर आरोग्य केंद्रातील औषध वितरणात निष्काळजीपणा उघड; आरोग्य केंद्रात चूक महागात

मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?

Whatsapp Scam : बॉसच्या नंबरवरून मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामं! भारतात नव्या व्हॉट्सॲप स्कॅमचा सुळसुळाट, 'या' लोकांना केलं जातय टार्गेट

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT