Eknath Shinde esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार; CM शिंदेंची मोठी घोषणा

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली.

भारत नागणे

पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून, हे सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे.

पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. यासाठी राज्य सरकारकडून 103 कोटी रुपयांचा निधी लवकरच दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पंढरपुरात केली.

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली. त्यानंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.

राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, शेतकरी सुखी समृद्धी होऊ दे असं आपण विठ्ठल चरणी साकडं घातल्याचंही ते म्हणाले. रस्ते, पाणी, दिवाबत्ती या सगळ्या गोष्टी होत राहतील. पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून, हे सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे. यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही, एवढी खात्री मी आपल्याला देतो. मी रस्त्यानं येताना पाहतो एवढं प्रेम वारकरी बांधव-भगिनींचं मिळतंय, हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं. त्यामुळं मी आपला ऋणी आहेस, असंही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT