Silver Meghdambari Vitthal Rukmini Temple esakal
सोलापूर

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

श्री विठ्ठल गाभाऱ्यातील लाकडी मेघडंबरी (Meghdambari) चांदीने मडवून बसविण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

या मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भाविक सुमीत गणपतराव मोरगे (Sumeet Morge) यांनी २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण केली.

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली विठुमाउली नव्याने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मेघडंबरीत विसावली असून मेघडंबरीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे (Vitthal Rukmini Temple) जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्त्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभाऱ्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे.

यामध्ये श्री विठ्ठल गाभाऱ्यातील लाकडी मेघडंबरी (Meghdambari) चांदीने मडवून बसविण्यात आली असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. या मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भाविक सुमीत गणपतराव मोरगे (Sumeet Morge) यांनी २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. गुरुवारी रात्री मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मेघडंबरीचे पूजन करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात बसविण्यात आली.

यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, विभाग प्रमुख संजय कोकीळ, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अतुल बक्षी, देणगीदार सुमीत मोरगे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कबीरदास महाराज फडाकडून मेघडंबरी अर्पण

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी अर्पण करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मेघडंबरीस सुमारे २ कोटी ४५ लाखांची चांदी नांदेड येथील दानशूर भाविक सुमीत मोरगे यांनी बसवून दिली आहे. त्यासाठी श्री विठ्ठल गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे १३५ किलो व श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे ९० किलो चांदीचा वापर करण्यात आला असून मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. सदर चांदीचा पत्रा १६ ते २६ गेजचा असून, हे काम पुणे येथील जांगिड सिल्वर वर्क्स यांनी केले आहे. १३ कारागिरांनी २५ दिवसांत हे काम पूर्ण केले आहे. लाकडी मेघडंबरी अमोल सुतार, बाळू सुतार, पांडुरंग लोंढे या कारागिरांनी तयार केला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT