Ashadhi Wari 2023 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : आषाढी यात्रेकरिता प्रासादिक वस्तूंची बाजारपेठ सज्ज

आषाढी यात्रेला राज्यासह परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व विदर्भ मराठवाड्यातील भाविकांची संख्या लक्षणीय असते

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - आषाढी यात्रेच्या सोहळ्याकरिता प्रासादिक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. आषाढी यात्रेला यंदा सुमारे १५ ते १८ लाख भाविकांचे आगमन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील प्रासादिक वस्तूंची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

आषाढी यात्रेला राज्यासह परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व विदर्भ मराठवाड्यातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी येथील बाजारपेठेमध्ये प्रसादिक वस्तूंची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अशा उत्साही वातावरणातच येणाऱ्या आषाढी यात्रेसाठी देखील व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. आषाढीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पेढे, चुरमुरे, बत्तासे, सुगंधित अगरबत्ती,अष्टगंध यासह फोटो फ्रेम, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आदी प्रासादिक साहित्याची दुकाने सज्ज झाली आहेत.

मागील वर्षी आषाढी यात्रा कालावधीमध्ये पावसाला सुरुवात झाली होती. पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश भाविक द्वादशी दिवशीच आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे प्रसादिक वस्तूचे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अपेक्षित व्यवसाय झाला नव्हता. यंदा पावसाने ओढ दिली असली तरी आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरेल आणि चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे.

सागर ताठे-देशमुख, सुगंधी अगरबत्ती उत्पादक, पंढरपूर.

नगरपालिका प्रशासनाने सूचना दिल्या नुसार आम्ही आमच्या कक्षेतच आपापली दुकाने थाटली आहेत. मात्र श्री विठ्ठल मंदिर परिसरात परगावच्या फिरते विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे चौफाळा, पश्चिम द्वार, महाद्वार, नामदेव पायरी या परिसरातील व्यापारी या फिरत्या विक्रेत्यांमुळे त्रस्त झाले आहेत. यात्रेला आलेल्या वारकऱ्यांनी यांचा त्रास होत आहे. तरी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

मधुकर गाडे, प्रसाद वस्तूंचे व्यावसायिक, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT