AShadhi Wari 2023 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : जातो माघारी पंढरीनाथा! तुझे दर्शन झाले आता!

यंदा देखील द्वादशी दिवशी लाखो भाविकांनी परतीची वाट धरली होती. पंढरपूर रेल्वे स्थानक व चंद्रभागा बस स्थानक परिसरात आपापल्या गावी परत जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .

राजकुमार घाडगे

Ashadhi Wari 2023 - आषाढी एकादशीला चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी व लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर द्वादशी दिवशी शुक्रवारी (ता.३०) भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते. "जातो माघारी पंढरीनाथा! तुझे दर्शन झाले आता" अशी भावना व्यक्त करीत जड अंत:करणाने लाखो भाविकांनी येथील चंद्रभागा बस स्थानक व पंढरपूर रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.

यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात होऊनही आषाढी यात्रे करिता सुमारे दहा ते बारा लाख वारकरी पंढरीत आले होते. दरवर्षी आषाढी यात्रेच्या सोहळ्याची सांगता पौर्णिमेला गोपाळकाल्याने होत असते. तदनंतरच वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. मात्र कोरोना नंतर मागील वर्षीपासून द्वादशीलाच बहुतांश भाविक परतीच्या प्रवासाला निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

यंदा देखील द्वादशी दिवशी लाखो भाविकांनी परतीची वाट धरली होती. पंढरपूर रेल्वे स्थानक व चंद्रभागा बस स्थानक परिसरात आपापल्या गावी परत जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

२४ जून ते ३ जुलै या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये रेल्वेच्या नियमित गाड्यांच्या १०० तर ज्यादा गाड्यांच्या ९४ फेऱ्या अशा एकूण १९४ फेऱ्या होणार आहेत. जवळपास अडीच लाख प्रवाशांनी यादरम्यान प्रवास केला असून सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेस प्राप्त होईल अशी माहिती पंढरपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक जे.पी.चनगौडर यांनी ' सकाळ' शी बोलताना दिली.

एस. टी. महामंडळाने यात्रा कालावधीसाठी सुमारे ५ हजार बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे महामंडळाने यंदाही जिल्हा निहाय बस गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते.

त्याप्रमाणे पंढरपूरच्या पंचक्रोशीतील गुरसाळे येथे विठ्ठल बसस्थानक, मोहोळ रस्त्यालगत भीमा बस स्थानक, सांगोला रस्त्यावरील बीडारी बंगल्यालगत पांडुरंग बस स्थानक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील नवीन चंद्रभागा बस स्थानक अशा चार ठिकाणाहून बस गाड्या सोडण्यात येत आहेत.

चंद्रभागा बस स्थानकामध्ये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, रायगड व पालघर जिल्ह्यासाठी बस गाड्या सोडण्यात येत होत्या. यंदाच्या आषाढीला एसटी प्रशासनाने प्रथमच नव्याने बांधण्यात आलेल्या चंद्रभागा बस स्थानकाचा यात्रा कालावधीसाठी वापर सुरू केला आहे.

त्यामुळे या बस स्थानकामध्ये शुक्रवारी सकाळ पासूनच लाखो भाविकांनी गर्दी केली होती. बस स्थानकातील प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. ठाणे येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी रांग पहावयास मिळाली.

या रांगेमध्ये उभा असलेल्या महिला प्रवासी विभा मनोज कोली (रा.खारघर, ठाणे) म्हणाल्या, आम्ही सर्वजण सकाळी सात वाजल्यापासून या रांगेमध्ये उभे आहोत.

दुपारचे बारा वाजले तरी देखील आम्हास अजून बस मिळालेली नाही. यासंदर्भात वाहतूक नियंत्रक स.भा.सोनलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, सकाळपासून ठाण्याला जाण्यासाठी ३० गाड्या सोडल्या आहेत. ठाण्याला जाण्यासाठी प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने महिला प्रवाशांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिल्याने आमच्या पैशांची बचत होत आहे. त्यामुळे आमचे सर्व महिला मंडळ आषाढी यात्रेला आले होते. सवलत दिल्याबद्दल आम्ही समस्त महिला वर्ग शासनाचे आभारी आहोत.- विभा मनोज कोली, ठाणे

आम्ही रेल्वेने सहकुटुंब आषाढी यात्रेला आलो होतो. आज परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे स्थानकामध्ये बसलो आहोत. मात्र रेल्वे स्थानकामध्ये कोठेही अद्ययावत वेटिंग रूम नसल्याने मोठी गैरसोय झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT