श्री संत गजानन महाराज sakal
सोलापूर

Ashadhi wari 2023 : संत गजानन महाराज पालखीचे मोहोळ तालुक्यात जल्लोषात स्वागत

शिंगोली तरटगाव येथे प्रवेश करताच गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : आषाढी वारीसाठी पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला निघालेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याने रविवार ता 25 रोजी पहाटे चार वाजता मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरटगाव येथे प्रवेश करताच गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

पालखीचे मोहोळ तालुक्यात आगमन होताच उत्साहाचे वातावरण तयार झाले. पालखीच्या स्वागतासाठी वरूण राजाने ही हजेरी लावली. गटविकास अधिकारी मिरगणे, प्रभारी तहसीलदार यादव यांनी स्वतः भजन म्हणून पहाट अभंग वाणीचा आनंद लुटला. भाविक व गावकरी ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक सोहळा संपन्न झाल्या नंतर पालखी सोहळ्याने कामती खुर्द मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आलेल्या सर्वच प्रमुख भजनी मंडळांचा व कार्यकर्त्यांचा सोमनाथ दवणे युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.

"एक कुटुंब एक वृक्ष, निर्मलवारी, हरित वारी" या पार्श्वभूमीवर प्रभारी तहसीलदार यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मिरगणे, प्रभारी तहसीलदार यादव यांच्यासह कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती, कक्ष अधिकारी शशी नडगिरी, विस्तार अधिकारी व्ही आर देशमुख, श्री शेजाळ, श्री वाघमारे, मंडल निरीक्षक सालीमठ, तलाठी राठोड, ग्रामसेवक सूर्यवंशी, सरपंच अविनाश मोटे, उपसरपंच पांडुरंग रासेराव, ग्रामपंचायत सदस्य महादेव भद्र शेट्टी, आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT