रस्ता  sakal
सोलापूर

Ashadhi wari 2023 : संत मुक्ताबाई पालखीमार्ग खड्डेमय

दुरुस्ती सुरू; कायमस्वरूपी रस्ता चांगला करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

माढा : श्री संत मुक्ताबाई पालखी मार्गावरील पापनस ते माढा या मार्गाचे कायमस्वरूपी चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता असून यंदा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता सिमेंटचा करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

दोन जूनला मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेल्या या पालखी सोहळ्याला सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शनिवारी (ता. २४) सकाळी पंढरपूरच्या आषाढी यात्रेत मानाचे स्थान असणारा श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा माढा तालुक्यातील रिधोरे येथे येणार आहे. त्यानंतर दुपारी वडशिंगे येथे हा पालखी सोहळा येणार असून शनिवारी सायंकाळी माढ्यात येऊन मुक्कामी राहणार आहे

या सोहळ्याने माढा तालुक्यात प्रवेश केल्यानंतर या पालखी सोहळ्याला खराब रस्त्यांना सामोरे जावे लागते. पापनस ते माढा यादरम्यानच्या खड्डेमय झालेल्या रस्त्यातून पालखी सोहळा न्यावा लागतो‌‌. श्री संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याशिवाय इतर अनेक पालख्या व छोट्या- मोठ्या दिंड्या या मार्गावरून जात असतात. हा मार्ग अतिशय खराब झाला आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या मार्गाची दुरुस्ती सुरू केलेली आहे. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी चांगला राहण्यासाठी हा रस्ता नव्याने चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे.

पूर्वी माढा ते शेटफळ हा पूर्ण मार्ग खराब होता. मात्र माढा ते शेटफळ य मार्गाचे सध्या डांबरीकरण झाले आहे. मात्र या कामाच्या दर्जा चांगला असावा, यासाठी आंदोलने झाली असून हा मार्ग किती दिवस चांगला राहणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र सध्या पापनस ते माढा हा मार्ग कमालीचा खराब आहे. सध्या या मार्गाची दुरुस्ती होत असली तरी हा पालखी मार्ग नव्याने करण्याची गरज आहे. हा मार्ग वारंवार खराब होत असल्याने हा रस्ता सिमेंटचा करण्याची गरज आहे.

पालखी मार्ग म्हणून व्हावी नोंद

पापनस - माढा - शेटफळ हा मार्ग वारंवार खराब होत आहे. या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या असतील तर हा मार्ग पालखी मार्ग म्हणून नोंदणीकृत करून सिमेंटचा करण्याची गरज आहे.

पापनस ते माढा या मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालखी सोहळ्याचे आगमन होण्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती पूर्ण करून घेणार आहोत.

- सुनील हेळकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, कुर्डुवाडी

श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. माढा ते शेटफळ हा मार्ग कायमस्वरूपी चांगला व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- मीनल साठे, नगराध्यक्षा, नगरपंचायत, माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT