Ashadi Wari  sakal
सोलापूर

Ashadi Wari: शेवटच्या मुक्कामासाठी वाखरीत असणार तब्बल १२ लाख भाविक

Ashadi Ekadashi : यंदा प्रथमच विस्तारित पालखीतळाची संकल्पन ; भाविकांसाठी मसाजची सोय

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

Pandharpur Latest Update: वाखरी (ता. पंढरपूर) येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी तब्बल ३० टक्के अतिरिक्त भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. त्या धर्तीवर यंदा प्रथमच ६५ एकरच्या धर्तीवर वाखरीतही ५२ एकर परिसरात स्वतंत्र १५ एकर विस्तारित पालखीतळाची संकल्पना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राबविली आहे.

पायी चालून आलेल्या भाविकांचा थकवा घालविण्यासाठी वाखरी ग्रामपंचायतीमार्फत खास १२ लोकांची टीम मोफत मसाज करण्यासाठी पाचारण केली आहे. येथे आयुर्वेदिक तेलाने २० खुर्च्यांवर २४ तास मसाज करून भाविकांचा थकवा घालविण्यात येणार आहे.

पंढरपुरातील गर्दी कमी होण्यास मदत

काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून नदी पलीकडे ६५ एकर पालखीतळाचा विकास करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व शहरातील गर्दीचा ताण कमी झाला होता. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी पालखीतळावर यावर्षी येणाऱ्या भाविकांच्या अधिकच्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वाखरी- टाकळी बायपासच्या शेजारी ५२ एकर परिसरात स्वतंत्र १५ एकर पालखीतळ विकसित करून त्या ठिकाणी दिंड्यांच्या वास्तव्याची सोय केली आहे. त्या ठिकाणी दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा व भोजन देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे.

पाच हजार बाम वाटप करणार

आळंदी-देहू ते पंढरपूर या मार्गावर वाखरी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण असते. त्यामुळे भाविक चालून चालून थकलेले असतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी इतर ठिकाणी जाणे अडचणीचे ठरत असल्याने पालखी तळावरच वाखरी ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना तब्बल पाच हजार बाम व प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पाच हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT