lodhi samaj 
सोलापूर

सोलापुरातील लोधी समाजाची आषाढी यात्रा यंदा घरीच होणार साजरी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील आदर्श नगर येथील वनशितलादेवी मंदिरात गेल्या तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आलेली लोधी समाजाची आषाढी यात्रा यंदा कोरोनाच्या महामारीमुळे घरीच साजरी होणार आहे.

सोलापुरातील लोध, लोधा, लोधी समाज ज्ञाती संस्थेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले यांनी दिली.समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष घनश्‍याम शिवसिंगवाले, वनशितलादेवी मंदिराचे अध्यक्ष रणजितसिंह दवेवाले यांच्यासह लोधी समाजाची पंच न्याय समिती, कुटुंबप्रमुख, मुरब्बीगण यांच्या अध्यक्षतेखाली लोधी समाजाची सर्वसाधारण सभा झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहनही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या बैठकीस सीताराम लंगडेवाले, राणेसिंग सतारेवाले, किसनसिंग कजाकवाले, राणोसिंग आंबेवाले, कन्हैयासिंग खंडेवाले, मोहनसिंग मौलावाले, चंदूसिंग मनसावाले, भरत मदनावाले, शंकरसिंग बाडीवाले, मन्नूसिंग बाबावाले, विठ्ठलसिंग शिवसिंगवाले, गुलजार शिवसिंगवाले, अशोक बोकेवाले, राजू जमादार, गणेश बऱ्हाणपुरे, राजेश दवेलावे, सीताराम मनसावाले, अर्तून शिवसिंगवाले, परशुराम सातारेवाले, लक्ष्मण चौधरी, सूरज मदनावाले, बन्सी कैय्यावाले, विजय कल्लावाले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT