Yashwant mane sakal
सोलापूर

Ajit Pawar: दिवाळी पर्यंत आष्टी उपसा सिंचन योजना होणार सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला भरघोस निधी

Ajit Pawar:

राजकुमार शहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील विविध सिंचन योजना साठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, येणाऱ्या दिपवाळी पर्यंत ही योजना कार्यान्वित करून, शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस आहे.

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच त्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पैसे त्यांना वेळेत द्यावेत. मतदार संघात रस्त्यांची मोठी कामे सुरू आहेत, मात्र "ही कामे आम्हीच केली" असे म्हणणाऱ्या पैकी मी नाही असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक 1 व वितरीका क्र 1 व 9 च्या कामाचे भूमिपूजन आमदार माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते चे अध्यक्ष विक्रांत पाटील अध्यक्षस्थानी होते.

यावेळी प्रास्ताविक करताना पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता ज्ञानदेव बागडे म्हणाले, सन 1995 /96 मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तब्बल 27 वर्षात अनेक लहान मोठी कामे पूर्ण केली आहेत. या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार नाहीत. लघु वितरेकेची सुमारे 15 कोटीची कामे आहेत. ही कामे एक वर्षात पूर्ण होणार आहेत.

या वेळी लोकनेते चे अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, या योजने मुळे गेल्या पाच वर्षाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. चालू वर्षी सरासरी पेक्षा पाऊस निम्माच झाला आहे. सर्व भिस्त आता उजनी वर आहे. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी संकटाचा आहे. शेतकऱ्यांनी आष्टी तलाव भरून देण्याची मागणी केली होती ती पुर्ण झाली असुन, सध्या आष्टी तलावात सर्वात जास्त पाणीसाठा आहे, पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विक्रांत पाटील म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी आमदार माने यांनी भरघोस निधी आणला आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात ही आमदार तुम्हीच आहात. फक्त आता जेवढी मते पडली त्यापेक्षा मताधिक्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश चवरे, सतीश भोसले, दत्ता पवार, मदन पाटील, पांडुरंग ताटे, चंद्रसेन जाधव, सचिन बाबर,सहाय्यक अभियंता नारायण जोशी आदीसह आष्टी, पापरी, खंडाळी, शेटफळ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT