Canva
सोलापूर

जिममध्ये व्यायाम करताना एसीपी सुहास भोसले यांचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना एसीपी सुहास भोसले यांचा मृत्यू

श्रीनिवास दुध्याल

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचा जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.

सोलापूर : पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले (Assistant Commissioner of Police Suhas Bhosale) यांचा बुधवारी (ता. 11) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ते 56 वर्षांचे होते. या घटनेमुळे पोलिस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज बुधवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करीत होते. सुरवातीला ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतरही त्यांनी व्यायाम चालू ठेवला आणि दुसऱ्यांदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या वेळी तेथील जिम ट्रेनरने त्यांच्या छातीला थोडा पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच सर्वांना एकत्रित करून सुहास भोसले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गाडीत बसवले अन्‌ हॉस्पिटलला पाठवले होते. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी एक चोरीची घटना घडली होती. त्या वेळी सुहास भोसले हे तातडीने घटनास्थळी हजर होऊन सर्वांना धीर दिला होता. "आम्ही आहोत काळजी नको. दोन दिवसांत सर्व ठीक होईल' असे ते म्हणाल्याची आठवण पत्रकारांमधून व्यक्त होत असून, एका चांगल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलिस प्रशासनाला धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुहास भोसले हे पोलिस आयुक्तालयाच्या डिव्हिजन क्रमांक एक या ठिकाणी विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. 1 एप्रिल 2019 रोजी अमरावतीहून त्यांची बदली झाल्याने ते सोलापुरात दाखल झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती कळतात हॉस्पिटलमध्ये पोलिस प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांनी गर्दी केली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT