Mohol Mandir 
सोलापूर

मोहोळ तालुक्‍यातील शंभर मंदिरे, 32 मशिदी, दर्गे दर्शनासाठी खुले; भाविक व व्यापाऱ्यांमध्ये पसरला आनंद 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या सुमारे पस्तीस नियमांचे पालन करीत मोहोळ तालुक्‍यातील विविध धर्मांची व देव-देवतांची सुमारे शंभर मंदिरे व 32 मशिदी, दर्गे दर्शनासाठी खुले करण्यात आल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली. मात्र, धार्मिक मिळावे, संमेलने यांच्यावरील बंदी कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांसह छोट्या व्यापारांतून समाधान व्यक्त होत आहे. 

पाडव्याच्या मुहूर्तावर शासनाने दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भाविकांसह मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मंदिर परिसरातील प्रसाद, हार, पेढे, खेळणी ही दुकाने बंद होती. त्यामुळे या व्यापाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र आज मंदिरे उघडताच त्यांनीही आपली दुकाने उघडली, त्यामुळे त्यांचे नियमित असे अर्थकारण सुरू झाले. 

सोमवारी सकाळी मंदिर उघडण्यात येऊन प्रारंभी त्यांची स्वच्छता करण्यात आली. वडवळ (ता. मोहोळ) येथे नागनाथांच्या दर्शनाची सुरवात सनई-चौघडा वाजवून करण्यात आली. मंदिर पंच कमिटीने शासकीय नियमांचा मंदिराबाहेर फलक लावला होता. या पंच कमिटीने थर्मल स्कॅनिंग यंत्र खरेदी केले आहे, त्याद्वारे प्रत्येकाला तपासूनच आत सोडले जात होते. 

शेटफळ (ता. मोहोळ) येथील सिद्धेश्वर मंदिरातील घंटा वाजवून भाविक दर्शनासाठी जात होते. गेल्या नऊ महिन्यांपासून ती घंटा बांधून ठेवण्यात आली होती, ती आज खुली करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा घंटानाद सुरू झाला आहे. 

मोहोळ शहरातील जैन धर्मीयांच्या आदिनाथ दिगंबर जैन मंदिराची सकाळी स्वच्छता करण्यात आली. पाडव्याच्या मुहूर्तावर आदिनाथ भगवंतांचा अभिषेक व नित्यपूजा करण्यात आली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत, पूजेसाठी जास्त वेळ मंदिरात थांबू नये असे मंदिर समितीने आवाहन केले होते, त्याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. 

तालुक्‍यातील मोठ्या मंदिरात - वडवळ, मोहोळ, शेटफळ, यावली, हिंगणी, पांडवाची पोफळी, पोखरापूर, सारोळे, आदींसह अन्य गावांचा समावेश आहे. दरम्यान, नियमांचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेण्याचे अवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SCROLL FOR NEXT