Murder
Murder 
सोलापूर

धक्कादायक ! "या' गावात सालगड्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

बाबासाहेब शिंदे

पांगरी (सोलापूर) : पत्नी व मुलीची छेड काढत असल्याने चिडून जाऊन बाप-लेकासह तिघांनी सालगड्याचा केबल वायरने गळा आवळून खून करून विहिरीतील पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याची घटना उघडकीस आली. ही घटना पांगरी शिवारातील जैनुद्दीन शेख यांच्या विहिरीत (ता. 8) घडली असून, उत्तम नारायण कांबळे (वय 55, रा. पिंपळगाव (दे) असे खून झालेल्या सालगड्याचे नाव आहे. शिवाजी भीमराव बोकेफोडे, रवी शिवाजी बोकेफोडे, आबा ऊर्फ राहुल उद्धव माने (रा. सर्व पिंपळगाव (दे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी सुरवातीला अनोळखी व्यक्तीचा अकस्मात मृत्यू म्हणून पांगरी पोलिसात गुन्हा नोंद केला. शवविच्छेदनानंतर खून झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन पथके तयार करून शोध घेतला असता, पिंपळगाव येथील उत्तम नारायण कांबळे हा बेपत्ता असल्याचे त्याच्या नातेवाइकाकडून समजले. त्यानंतर अधिक चौकशीअंती उत्तम कांबळे हा शिवाजी भीमराव बोकेफोडे यांच्याकडे चार वर्षांपासून सालगडी म्हणून कामास होता. किरकोळ कारणावरून या दोघांत वाद झाला होता असे समजले. 

बेपत्ता झाला त्या दिवशी उत्तम कांबळे याच्या घरी शिवाजी बोकेफोडे याने रात्री अकरा वाजता त्याला मासे धरण्याचे कारण सांगून बाहेर नेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शिवाजी बोकेफोडे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, उत्तम कांबळे हा आपल्या पत्नी व मुलीची वारंवार छेड काढत होता. त्यामुळे त्याला (ता. 3) रक्षाबंधन दिवशी मुलगा रवी बोकेफोडे, आबा ऊर्फ राहुल उद्धव माने यांनी गोड बोलून मासे धरण्याचे कारण सांगून पांगरी परिसरातील विहिरीवर आणले. तेथील केबल वायरने उत्तम कांबळे याचा गळा आवळून खून केला व विहिरीतील पाण्यात त्याचा मृतदेह टाकण्यात आला. सहा दिवसांनंतर विहिरीतून वास येऊ लागल्यानंतर मृतदेह बाहेर काढून तपास करण्यात आला. अवघ्या सहा तासांत संशयित आरोपीस ताब्यात घेऊन पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT