Maharashtra Loksabha Election 2024 esakal
सोलापूर

निवडणूक काळात ट्रॅव्हल्स, टॅंकर, दूध-भाजीपाल्याच्या वाहनांवर लक्ष! जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस व ‘एक्साईज’चे 15 चेकपोस्ट; 40,000 वाहनांची तपासणी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दारू, पैसा अशा बाबींचा अवैध मार्गाने वाहतूक होणार नाही, याची खबरदारी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या १२ ठिकाणी ग्रामीण पोलिसांचे चेकपोस्ट असून राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तीन ठिकाणी नाकाबंदी लावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दारू, पैसा अशा बाबींचा अवैध मार्गाने वाहतूक होणार नाही, याची खबरदारी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या १२ ठिकाणी ग्रामीण पोलिसांचे चेकपोस्ट असून राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तीन ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. त्याठिकाणी १६ मार्च ते ६ एप्रिल या २१ दिवसांत तब्बल ४० हजारांहून अधिक वाहने तपासण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदारांना कोणीही प्रलोभने दाखवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक अवैध तथा गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदीच्या (चेकपोस्ट) ठिकाणी ट्रॅव्हल्स, टॅंकर, कंटेनर, दूध-भाजीपाल्याची वाहने, चारचाकी अशा वाहनांची तपासणी केली जात आहे.

२१ दिवसांत ४४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरील राज्यातून किंवा जिल्ह्यातून सोलापूर शहर- जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे. त्यासाठी विशेष पथके नेमली असून नांदणी, वागदरी, मरवडे या ठिकाणी नाकाबंदी देखील आहे. १६ मार्च ते ६ मार्च या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध कारवायातून ४४ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

व्हिडिओ शूटिंगमध्ये वाहनांची चेकपोस्टवर तपासणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर ग्रामीण पोलिसांचे १२ चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून (१६ एप्रिल) त्याठिकाणी प्रत्येक संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. मागील २१ दिवसांत अंदाजे ३५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून तेथील शूटिंग थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या कार्यालयात पाहता येते. दुसरीकडे महसूल व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी करत आहेत. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेकपोस्टवरील कामकाज नियोजनबद्ध सुरु असल्याची स्थिती आहे.

‘एक्साईज’ची २१ दिवसांतील कामगिरी

  • एकूण ४४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • १३२ गुन्ह्यांमध्ये १०५ जणांना अटक, १७ वाहने जप्त

  • साडेचार हजार हातभट्टी, ५२ हजार लिटर रसायन, सव्वातीनशे लिटर देशी-विदेशी दारू जप्त

  • बियर, ताडी, गोव्याची दारू असा एकूण सहाशे लिटर मुद्देमाल हस्तगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT