Awarding Director General of Police Medal to Police Naik Jagdish Kasture solapur sakal
सोलापूर

पोलीस नाईक जगदीश कस्तुरे यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान

16 वर्षाच्या सेवेत एकूण 132 विविध बक्षिसे

राजकुमार शहा

मोहोळ : शिंगोली ता.मोहोळ येथील रहिवासी आणि सध्या शिवाजीनगर पुणे येथील पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर कर्तव्य बजावणाऱ्या जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. जगदीश कस्तुरे हे पोलीस नाईक म्हणून मुख्यालय पुणे शहर पोलीस दलात सन 2006 साली भरती झाले आहेत.त्यांच्या 16 वर्षाच्या सेवेत एकूण 132 विविध बक्षिसे मिळालेली आहेत. तसेच हॉकी या खेळात सुद्धा राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी विशेष प्राविण्य मिळविले आहे.

जाहीर झालेले पोलीस महासंचालक पदक हे सलग 15 वर्षे अभिलेख उत्तम राखल्या बदद्ल पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कडुन 30 एप्रिल रोजी पदक जाहीर करण्यात आले होते. पोलीस महासंचालक पदक हे श्री अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त याचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त ,जालिंदर सुपेकर अप्पर पोलीस आयुक्त,श्री विवेक पाटील पोलीस उप आयुक्त मुख्यालय पुणे शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालय शिवाजीनगर येथे कार्यक्रम पार पाडला.या सन्मानाबद्दल त्यांचे पोलीस दल व मित्रपरिवारात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT