सोलापूर

नाभिक समाजासाठी वंचित आघाडीची सोलापुरात गांधीगिरी (VIDEO)

विजयकुमार सोनवणे

सोलापूर -  शहरातील केशकर्तनालयाची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, या व नाभिक समाजाच्या इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी प्रतीकात्मक "कटिंग' आंदोलन करण्यात आले. प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी यांची प्रतीकात्मक "कटिंग' केली. या वेळी नाभिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


मागील आठवड्यापासून काही व्यवसाय, उद्योग व दुकाने यांना नियम व अटी घालून ज्या पद्धतीने सुरवात करण्यास परवानगी देण्यात आली त्याच पद्धतीने नाभिक समाजाला दुकाने, सलून पार्लर यांनाही नियम व अटी घालून व्यवसाय चालू करण्यास परवानगी देण्यात यावी. व्यवसाय सुरू न झाल्यास नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला महिना 10 हजार अनुदान स्वरूपात देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक "कटिंग' करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, अनिरुद्ध वाघमारे, नाभिक समाजाचे शहराध्यक्ष मोहन जमदाडे, भारत क्षीरसागर, यशवंत शेंद्रे उपस्थित होते. दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्री. चंदनशिवे व श्री. पुजारी यांनी दिला. 

सलून दुकाने उघडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आमचे कुटुंबीय आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुकाने उघडण्यास परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. 
- मोहन जमदाडे, प्रतिनिधी, नाभिक समाज 

दुकाने उघडण्यास परवानगी द्यायची नसेल तर समाजातील प्रत्येक कुटुंबीयांना दर महिन्याला किमान पाच हजार रुपयांची मदत द्यावी. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबीयांची उपासमार सुरू झाली आहे. 
- भारत क्षीरसागर, प्रतिनिधी, नाभिक समाज 

नाभिक समाजासाठी वंचित आघाडीची सोलापुरात गांधीगिरी (VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT