bail pola  sakal
सोलापूर

Bail Pola :सर्जा-राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी

पावसाअभावी बळिराजा चिंतेत, तरीही पोळा सणाच्या खरेदीचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - बळिराजाला वर्षभर शेतात राबण्यासाठी मदत करणाऱ्या सर्जा- राजाचा पोळा सण यंदा गुरुवारी (ता. १४) साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील आठवडी बाजारामध्ये आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्याकरिता साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली.

पोळा सणाच्या निमित्ताने पंढरीत मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. सर्जा-राजाला सजवण्यासाठी लागणारे इंगूळ, भोरकडी, पितळी शेंबी, चवरी, घुंगरू, कपाळ गोंडा, कवडी माळ, पैंजण, कासरा, वेसण गोंडे, बेगडी, म्होरकी, कासरा, चवरी आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यासाठी येथील बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे बळिराजा चिंतेत आहे. तरी देखील पोळा सणासाठी खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये उत्साह जाणवत आहे. यंदा सजावट साहित्याच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. तरी देखील काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी शेतकरी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे साहित्य खरेदी करताना दिसून आले.

यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नसला तरीसुद्धा पोळा सणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बजेटप्रमाणे पोळ्याच्या सजावट साहित्याची खरेदी केली. त्यामुळे चांगला व्यवसाय झाला.

अजित पाटील, सजावट साहित्य विक्रेते, पंढरपूर

यावर्षी पावसाने दडी मारली आहे, तरी देखील वर्षभर राबणाऱ्या गाई- बैलांचा पोळा हा हक्काचा सण आहे. त्यांना सजवण्यासाठी सजावटीच्या साहित्याची खरेदी केली.

धुळा गावडे, व्हळे, ता. पंढरपूर

मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी

पोळा सण साजरा करण्यासाठी घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन केले जाते. या मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी असून, आकाराप्रमाणे शंभर ते दोनशे रुपये किंमत आहे, अशी माहिती ओंकार कुंभार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT