hatpump.jpg 
सोलापूर

हातपंपाला सलाईन लावून केले बॅन्डेज : सेनेचे आंदोलन 

अमोल व्यवहारे

सोलापूर: सुस्थितीत असलेला हातपंप पूर्ववत करून देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हातपंपाला सलाईन व बॅंन्डेज बांधून शिवसेनेच्यावतीने आगळ्यावेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. 
स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराने लक्ष्मी मंडई परिसरातील सार्वजनिक हातपंपावरील इलेक्‍ट्रिक मोटार त्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी काढून घेतली. नंतर त्याच्याकडील इलेक्‍ट्रिक मोटार लावली. काम संपल्यानंतर त्या कंत्राटदाराने त्याची इलेक्‍ट्रिक मोटार काढून घेतली व पूर्वीची मोटारदेखील घेऊन सर्व साहित्य घेऊन निघून गेला. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने त्या कंत्राटदाराला हातपंप पुर्ववत करून देण्यास सांगितले होते. याबाबत विभागीय अधिकारी तपण डंके यांनाही समक्ष भेटून कल्पना दिली होती. चार दिवसात काम करून देतो म्हणून आता पंधरा दिवस झाले तरी कंत्राटदार हातपंप पूर्ववत करून देत नाही. सुस्थितीत असलेला हात पंप इलेक्‍ट्रक मोटार काढल्यामुळे बंद झाला. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने या हातपंपाला सलाईन व बॅंडेज बांधण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, अमित अंजीखाणे, विश्वनाथ गोयल, सुशील बायस, वागदूरगीसह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT