Karadkar Maharaj 
सोलापूर

निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धारासाठी बंडातात्या कराडकर यांनी दिले 11 लाख ! 

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धारासाठी युवकमित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी 11 लाख 11 हजार 111 रुपये प्रज्ञाचक्षू त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते विश्वस्तांकडे दिले. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की युवकमित्र बंडातात्या कराडकर यांनी 2008 सालापासून दरवर्षी एका ज्योतिर्लिंगावर गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. बारावे पारायण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे 4 मार्च रोजी पार पडले होते. मात्र त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे जमा - खर्च सादर करता आला नव्हता. 
या सर्व पारायण सोहळ्यातील उर्वरित रक्कम सिन्नर भूषण, प्रज्ञाचक्षू त्रंबकबाबा भगत, ज्येष्ठ कीर्तनकार माधवबाबा घुले यांच्या हस्ते विश्वस्त संजय महाराज धोंडगे, जयंत महाराज गोसावी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. 

या वेळी रामकृष्ण महाराज लहवीतकर, माधवदास महाराज राठी, त्र्यंबकराज देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, ललिता शिंदे, दीपक महाराज देशमुख, दत्ता राऊत, प्रवीण वाघ, ज्ञानेश्वर आरोटे, सागर दौंड, व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष शहाजी काळे, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बंडातात्या कराडकरांनी स्वीकारली सोने जमा करण्याची जबाबदारी 
निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या कळसासाठी लागणारे सर्व सोने जमा करण्याची जबाबदारी युवकमित्र बंडातात्या कराडकर यांनी स्वीकारली आहे. सप्ताहाच्या काळात विविध प्रकारे मदत, श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT