ऑपरेशन परिवर्तन
ऑपरेशन परिवर्तन esakal
सोलापूर

ऑपरेशन परिवर्तनातून उजेडात आला ‘बंजारा ब्रँड’! ७१४ जणांनी सोडला हातभट्टीचा व्यवसाय

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील बहुतेक गावांत हातभट्टीची विक्री आणि पिणाऱ्यांची भांडणे, अशीच स्थिती होती. शहरानजीकचा मुळेगाव तांडा म्हटलं की हातभट्टी निर्मितीचा अड्डा, अशी ओळख होती. पण, ती परिस्थिती बदलून तांड्यांवरील तरुणांचे भविष्य अंधारात जाणार नाही, हा प्रामाणिक हेतू ठेवून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेतले. एका वर्षात ७१४ कुटुंबांनी तो व्यवसाय सोडून ‘बंजारा ब्रँड’ उजेडात आणला.

दरवर्षी गुन्हेगारीत आठ ते नऊ टक्क्यांनी वाढ होतेच, असा पोलिसांचा अंदाज असतो. चोरी, खून, दरोडा, लूटमार, हाणामारी, शेती, जागांचे वाद, विनयभंग, महिलांवरील अत्याचार व ऑनलाइन फसवणूक असे गुन्ह्यांचे स्वरूप असते. त्या सर्व गुन्ह्यांमागे मद्यपान हे प्रमुख कारण मानले जाते. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध धंदे बंद होणे गरजेचे असते. ही बाब ओळखून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा हातभट्टीमुक्तीचे नियोजन केले. काही दिवस अभ्यास केल्यानंतर त्यांनी सर्वाधिक हातभट्टी तयार होणारे तांडे व हातभट्टी विक्री होणाऱ्या गावांची यादी बनविली. प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यांना दत्तक दिले. आठवड्यातून दोनदा छापा तथा धाड टाकायची, तेथील लोकांचे समुपदेशन करण्यावर भर दिला. सलग १२ महिने त्यात सातत्य ठेवल्याने आता सप्टेंबर २०२१ आणि आताची परिस्थिती यात खूप मोठा बदल झाला आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या तोच तो अवैध व्यवसाय करणे सोडून दिलेल्यांना पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय हातभट्टीची निर्मिती थांबणार नाही, याची जाणीव देखील पोलिस अधीक्षकांना होती. त्यामुळे त्यांनी उमेद व बॅंकांच्या माध्यमातून त्या लोकांना प्रशिक्षण व अर्थसहाय्य केले. त्यामुळे अनेकांनी खवा निर्मिती सुरू केली. कापड विक्री, किराणा दुकाने सुरू केली. काहीजण शेती, पशुपालन करू लागले. महिलांनी एम्ब्रॉयडरी सुरू केली. हातभट्टी गाळणाऱ्या महिला आता आकर्षक, सुबक, सुंदर वस्तूंची निर्मिती करीत आहेत.

वर्षात समाधानकारक कामगिरी

पिढ्यान्‌पिढ्यांच्या अवैध व्यवसायामुळे मुलांचे भविष्य खराब करणारी हातभट्टी बंद करण्यासाठीच ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेतले. एका वर्षात सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हे ऑपरेशन यशस्वी झाले.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

यश ‘ऑपरेशन परिवर्तन’चे...

  • १) सप्टेंबर २०२१च्या तुलनेत ८५ टक्के हातभट्टी निर्मिती व विक्री कमी झाली

  • २) हातभट्टी गाळणाऱ्या व दारू विक्री करणाऱ्या ७१४ जणांनी सोडला अवैध व्यवसाय

  • ३) २१५ व्यक्ती विशेषत: महिलांच्या हस्तकलेला मिळाला वाव; बंजारा ब्रँड पोचला मसुरीपर्यंत

  • ४) सोलापुरातील पहिल्याच प्रदर्शनातून बंजारा ब्रँडची दहा लाखांची कमाई

  • ५) आता बंजारा ब्रँड ‘फ्लिपकार्ट’वरही उपलब्ध; देशपातळीवरील दोन पुरस्कारांनी पोलिस अधीक्षकांचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT