Bachat Gat. 
सोलापूर

दहा-वीस रुपयांची बचत बनली महिलांचा मोठा आधार ! बॅंकेने 82 लाखांचे कर्ज देऊन दिली उद्योजिका होण्याची उमेद

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील उमेद अभियानातंर्गत बॅंक ऑफ बडोदा, वडाळा शाखेने महिला बचत गटांना 82 लाख रुपये कर्ज देऊन महिलांना नवी उमेद दिली आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात महिला बचत गटांची चळवळ तळागाळापर्यंत पोचत आहे. यासाठी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील उमेद अभियान अंतर्गत सुरवातीला दर आठवडा दहा - वीस रुपयांची बचत सध्या महिलांसाठी मोठा आधार बनली आहे. सध्या महिलांसाठी पशुपालन, शेती, विविध मसाले बनविणे, हस्तकला वस्तू, पापड उद्योग, कापड दुकान आदी विविध व्यवसाय करण्यासाठी रानमसले, वडाळा, दारफळ (गा.), वांगी येथील 67 महिला बचत गटांना 82 लाखांचे कर्ज देऊन बॅंक ऑफ बडोदाने महिलांना नवी उमेद दिली आहे. 

रानमसले (ता. उ. सोलापूर) येथील 25 महिला बचत गटांना 25 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप बॅंक ऑफ बडोदाचे वडाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक विवेक बावीस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बावीस्कर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले, बचत गटांनी आपले कर्ज वेळेत परतफेड करून आपली पत राखावी. कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांनाच यापुढे कर्ज वाटप करण्यात येईल. यासाठी आपापल्या उद्योग - व्यवसायात प्रगती करून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले. 

या वेळी बॅंक सखी सारिका साठे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. रानमसले येथील बचत गटांना कर्ज वाटप करण्यासाठी रोहिणी कुंभार, सोनम गजघाटे यांनी परिश्रम घेतले. या वेळी महिला बचत गटातील रत्नमाला शिंदे, महानंदा गरड, विद्या गरड, कविता कुंभार, सरस्वती गरड, लताबाई गरड, लता शेरखाने, वर्षा वाघमारे, जया गरड, शीतल वाघमारे, अर्चना गरड, श्‍यामल गोरे, सुरेखा गरड, शुभांगी पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यामध्ये उत्तर उमेद अभियानातील उषा तोंडसे, पूनम दुध्याल, प्रमोद चिंचोरे यांचे सहकार्य लाभले. 

82 लाखांचे कर्ज वाटप 

  • वडाळा येथील 27 महिला बचत गटांना 46 लाख 50 हजार रुपये 
  • वांगी येथील 7 महिला बचत गटांना 6 लाख 50 हजार रुपये 
  • दारफळ (गा.) येथील 4 महिला बचत गटांना 4 लाख रुपये 
  • रानमसले येथील 25 महिला बचत गटांना 25 लाख रुपये 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले

करण जोहरने अनन्याला केला चुकीचा स्पर्श? नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले...'अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच कसं...' Viral Video

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची मंजुरी

Iran Attack Kuwait : कुवेतच्या वीजनिर्मिती आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणचा मोठा हल्ला; भारतीय कामगाराचा मृत्यू

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

SCROLL FOR NEXT