Bank gift to police 
सोलापूर

चोरीची रक्कम परत मिळाल्याने बॅंकेने पोलिसांना दिले "हे' गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बार्शी येथील उस्मानाबाद जनता बॅंकेत झालेली चोरी चोवीस तासांच्या आत उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्यांकडून 67 लाख रुपये जप्त केले होते. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी उस्मानाबाद जनता बॅंकेकडे सुपूर्द केली. चोरीची रक्कम परत मिळवून दिल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून बॅंकेकडून पोलिसांना बार्शी शहरात पेट्रोलिंग करण्यासाठी एक दुचाकी वाहन आणि एक व्हिडिओ कॅमेरा भेट देण्यात आला.

बॅंकेचा शिपाईच निघाला आरोपी
बार्शी येथील सोमवार पेठेतील उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेच्या शाखेतून 16 डिसेंबर 2019 रोजी सुमारे 68 लाख 43 हजार 800 रुपयांची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला होता. या प्रकरणात बॅंकेतील शिपाई विजय विश्‍वंभर परीट व महावीर चांदमल कुंकूलोळ यांना अटक करण्यात आली होती. चोरलेल्या रकमेपैकी 67 लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्‍वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गिरी गोसावी यांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेली रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या हस्ते बॅंकेचे जनरल मॅनेजर एम. बी. गायकवाड व बार्शी शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT