Bank of Indias ATM has opened with the help of a gas cutter at Kurduwadi 2.jpg 
सोलापूर

बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले; साडे अकरा लाखाचा ऐवज लंपास

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : येथील माढा रस्त्यालगत असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या फोडून चोरट्यांनी ११ लाख ४२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत सचिन सुखदेव चौधरी (वय ३० रा. शिरोळे, ता बार्शी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

बॅंक ऑफ इंडिया, कुर्डुवाडी शाखेच्या माढा रस्त्यालगत असलेले एटीएम फायनान्शियल सिस्टीम सॉफ्टवेअर प्रा.लि.या कंपनीचे आहे. फिर्यादी हे या कंपनी मध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत आहेत. सोमवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास सीएमएस कंपनीकडील कॅश लोड करणारे कर्मचारी आश्रम बेडकूते (रा. वरकुटे, ता. करमाळा), अनिल भाग्यवंत (रा.झरे ता.करमाळा) यांनी बँकेच्या कुर्डुवाडी शाखेतून ५ लाख रुपये सदर एटीएम मशीन मध्ये भरले होते. मंगळवारी (ता २४) रात्री १२ वाजून ५ मिनिटे ते पहाटे ५ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २४ तास सेवेसाठी उघडे असलेल्या या एटीएमच्या दरवाज्यातून आत जाऊन मशीनचे समोरील बाजूचे लॉक गॅस कटरच्या साहाय्याने तोडून आतील सुमारे ११ लाख ४२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली. 

सकाळी एटीएमची स्वच्छता करण्यासाठी अरविंद जगताप (रा.कुर्डुवाडी) तेथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी लगेच बँक ऑफ इंडिया कुर्डुवाडीचे शाखाप्रबंधक उदय काकपूरे यांना सांगितले. श्री काकपूरे यांनी तात्काळ पोलिसांना ही घटना कळवली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व श्री काकपूरे यांनी भेट दिली. चोरट्यांनी २ हजार रुपयांच्या ६ नोटा, ५०० रुपयांच्या २२५३ नोटा, १०० रुपयांच्या ३५ नोटा चोरुन नेल्या आहेत.  यामध्ये एटीएम मशीनचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT