The bank was closed for seven days after Director Corona tested positive 
सोलापूर

संचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बॅंकच सात दिवसांसाठी बंद 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : येथील पंढरपूर मर्चंट बॅंकेच्या एका संचालकाच्या माध्यमातून अन्य चार संचालक आणि एक कर्मचारी अशा पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याने आजपासून दहा जुलैपर्यंत बॅंक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे संपूर्ण बॅंकच बंद ठेवण्याची सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असण्याची शक्‍यता आहे. 
या बॅंकेच्या संचालक मंडळाची 24 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बॅंकेचे बहुतांश संचालक उपस्थित होते. त्यापैकी शिक्षक असलेल्या एका संचालकास कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु त्याची तपासणी झालेली नव्हती. त्या संचालकाच्यामुळे बैठकीस उपस्थित असलेल्या अन्य चार संचालक आणि एका कर्मचाऱ्यास संसर्ग झाला. संबंधित सर्वांना वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 
दरम्यान, दक्षता म्हणून पंढरपूर नगरपालिकेने बॅंकेस पत्र देऊन आज तीन जुलैपासून दहा जुलैपर्यंत बॅंक बंद ठेवण्यास कळवले आहे. त्यानुसार आजपासून बॅंक सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा पद्धतीने बॅंकेचे पाच संचालक आणि एक कर्मचारी अशा सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यामुळे बॅंकच बंद ठेवण्याचा निर्णय झालेली सोलापूर जिल्ह्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. बॅंकेने यासंदर्भात एक निवेदन तयार करून सोशल मीडियाद्वारे ते व्हायरल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT